‘बिग बॉस’ हिंदीच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी आज गेली काही वर्ष सलमान खान उत्तमरित्या सांभाळतो. स्पर्धकांची शाळा घेणं असो वा त्यांना वेळोवेळी ओरडणं असो सलमान ते अगदी योग्य पद्धतीने करतो. जवळपास गेली १२ वर्ष तो या शोचा सुत्रसंचालक म्हणून काम पाहत आहे. आता ‘बिग बॉस’चं १६वं पर्व सुरु झालं आहे. ‘बिग बॉस’चं घर किती आलिशान आहे हे आपल्या साऱ्यांनाच ठाऊक आहे. पण तुम्हाला माहित आहे का? ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी सलमानसाठीही एक आलिशान घर बनवलं आहे.

सलमान कित्येक वर्ष आपल्या कुटुंबियांसह गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहत आहे. पण ‘बिग बॉस’च्या चित्रीकरणादरम्यान तो वेगळ्याच घरामध्ये राहतो. ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी खास त्याच्यासाठी एक सुंदर घर बनवलं आहे. हे घर आताच्या ‘बिग बॉस’ घराशेजारीच आहे. ‘बिग बॉस’च्या चित्रीकरणादरम्यान तो याच घरामध्ये राहतो.

सलमानसाठी ‘बिग बॉस’ने तयार केलं आलिशन घर

सलमानचा स्टायलिस्ट व डिझायनर एशले रेबेलोने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याच घराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहता सलमानसाठी तयार करण्यात आलेलं घर किती मोठं आहे हे लक्षात येतं. व्हिडीओच्या सुरुवातीमध्येच गार्डन, भली मोठी जागा, सोफा दिसत आहे.

आणखी वाचा – Video : पत्नीला पाहताच मिठी मारली अन् रडू लागले अमिताभ बच्चन, पण नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस’च्या घराप्रमाणेच या घरामध्येही लिव्हीगं रुम, जीम, बेडरूम आहे. तसेच या घराच्या भिंतीवर सलमानचे आणि त्याचे आवडते पेंटिंग्स आहेत. तसेच लिव्हींग रुममध्ये मोठा टीव्हीदेखील आहे. सलमानसाठी तयार करण्यात आलेल्या या घराचं डिझाइन व इंटेरियर खरंच लक्षवेधी आहे.