मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वातून ते घराघरात पोहचले. काही दिवसांपूर्वीच दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतंच एका मुलाखतीत अमृताने प्रसादबरोबर लग्न करायला होकार का दिला, या मागच्या कारणाचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- “तुझी बहीण बघ किती सुंदर आणि कर्तृत्ववान”, नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेवर गौतमी देशपांडेचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

एका मुलाखतीत अमृताने प्रसादमधील आवडणाऱ्या गुणांबाबत सांगितलं आहे. अमृता म्हणाली, “मला हव्या असणाऱ्या अनेक गोष्टी प्रसादमध्ये आहेत. तो घर खूप चांगलं नीटनेटकं ठेवतो. मला स्वयंपाकाची तेवढी आवड नाहीये, पण जेव्हा मी लग्नाचा विचार केला तेव्हा लग्नानंतर स्वयंपाक करण्याची जबाबादारी माझ्यावर येऊ शकते हे मला माहिती होतं. यासाठी माझी तयारीही होती, पण प्रसाद खूप चांगलं जेवण बनवतो. त्याला सगळचं येतं. मला रोजचं आयुष्य जगण्यासाठी हा पार्टनर म्हणून हवा आहे हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मी आणि प्रसादने एकत्र राहायला सुरुवात केली.”

अमृता पुढे म्हणाली, “लग्न हे ओघाने येतंच. एका ठराविक टप्प्यानंतर लग्न येतंच. आम्हाला एवढं कळालं होतं की, एकत्र राहायचं आहे. पण, मग घरचे विचारत होते एकत्र राहायचं आहे तर लग्न करणार आहात ना तुम्ही. लग्नाचा विषय अचानक नाही निघत आपल्याकडे. तो खूप चर्चा करूनच निघतो. हळूहळू त्या गोष्टी बाहेर निघत गेल्या आणि मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा- Video : ‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्याला पोहोचली मलायका अरोरा, श्रेया बुगडेला पाहताच केलं असं काही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही महिन्यांपूर्वीच अमृता आणि प्रसादने गुपचूप साखरपुडा करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता दोघांनी लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. येत्या १८ नोव्हेंबरला अमृता आणि प्रसाद लग्नगाठ बांधणार आहेत. दोघांच्या घरी लग्नाची जय्यत तयारीही सुरू झाली आहे.