‘बिग बॉस १३’मुळे पंजाबी अभिनेत्री हिंमाशी खुराना प्रकाश झोतात आली. ‘बिग बॉस’च्या १३व्या सीझनमध्ये ती विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरली. आसिम रियाजबरोबर असलेलं तिचं नातं तर जगजाहिर झालं. पण या बहुचर्चित शोनंतर हिमांशीला नैराश्येचा सामना करावा लागला. आता तिने ‘बिग बॉस’वरच राग व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – “मालिका अत्यंत भंगार” ‘आई कुठे काय करते’च्या ‘त्या’ व्हिडीओवरील कमेंट चर्चेत, नेमकं प्रकरण काय?

हिमांशीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. हिमांशीने तिच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर तिच्यावर काय परिणाम झाला याबाबत खुलासा केला.

मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत तिने म्हटलं की, “रिअ‍ॅलिटी शोद्वारे तुम्हाला एक व्यक्ती म्हणून कसं दाखवलं जातं याआधारे लोक जज करतात. पण कॅमेऱ्याच्या मागे नेमकं काय चालतं? याची कल्पनाही प्रेक्षकांना नसते.”

आणखी वाचा – दिवस-रात्र नशेमध्येच असायचे खरे ‘बिग बॉस’, गंभीर आजारामुळे मरणाच्या दारात पोहोचले, रुग्णालयामध्ये घडलं असं काही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिमांशीने तिच्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, “जेव्हा मी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये गेली तेव्हा सगळ्यांनी विचार केला की आता माझं आयुष्य बदलणार. पण सत्य काही वेगळंच होतं. या घरातील नकारात्मक वातावरणामुळे मला नैराश्येचा सामना करावा लागला. मला खूप काही सहन करावं लागलं. या सगळ्यामधून बाहेर पडायला मला दोन वर्ष लागले.” हिमांशी ‘बिग बॉस’नंतर शो किंवा कोणत्याही पार्टीमध्ये जायची तेव्हा तिला पॅनिक अटॅकही यायचे. हिमांशीची झालेली ही अवस्था खरंच विचार करायला लावणारी आहे.