‘बिग बॉस हिंदी’चं सोळावं पर्व प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. या पर्वातील छोटा पॅकेट बडा धमाका असलेल्या अब्दू रोझिकने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. अब्दूची क्यूट स्टाइल व दिलखुलास अंदाजावर प्रेक्षक फिदा होते. त्यामुळेच प्रेक्षकांच्या आग्रहास्तव घरातून बाहेर पडलेल्या अब्दूची ‘बिग बॉस’मध्ये घरवापसी झाली होती. आता पुन्हा एकदा अब्दू रोझिकला ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घ्यावा लागणार आहे.

‘कलर्स टीव्ही’च्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अब्दू रोझिकची ‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरे, एमसी स्टॅन व साजिद खान यांच्यासह घट्ट मैत्री झाली. मराठमोळ्या शिव ठाकरेसह अब्दूचं खास नात होतं. त्यामुळेच अब्दू रोझिक घराबाहेर पडताच शिवला अश्रू अनावर झाले.

हेही वाचा>> अंगप्रदर्शन करणं महागात पडलं, उर्फी जावेदला मुंबई पोलिसांची नोटीस

हेही वाचा>> अपूर्वा नेमळेकरचं महेश मांजरेकरांबाबत धक्कादायक विधान, म्हणाली “त्यांच्यामुळे…”

अब्दू रोझिकने ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेतल्यानंतर घरातील सदस्य भावूक झालेले व्हिडीओत पाहायला मिळत आहे. शिव ठाकरे ढसाढसा रडत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. घरातून बाहेर पडताना अब्दू शिवला “मेरा जान मेरा दिल” असं म्हणत आहे. शिव व अब्दूची घरातील मस्ती व केमिस्ट्रीही प्रेक्षकांना पाहायला आवडायची. ‘कलर्स’ने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी शिव व अब्दूच्या फ्रेंडशिपबाबत कमेंटही केल्या आहेत.

हेही पाहा>> …अन् राणादाने पाठकबाईंना सगळ्यांसमोरच उचललं; अक्षया-हार्दिकची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत, पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस १६’ पर्वातील अब्दू रोझिक हा सर्वांचा लाडका सदस्य होता. घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी तो एक होता. परंतु, आता अब्दूचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे.