‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यंदाच्या पर्वात बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानही सहभागी झाला होता. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांसाठी फराह खानने पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला ‘बिग बॉस १६’च्या स्पर्धकांनी हजेरी लावली.

फराह खानच्या पार्टीतील शिव ठाकरे व अर्चना गौतम यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सतत भांडणारे शिव व अर्चना या व्हिडीओमध्ये एकत्र डान्स करताना दिसत आहेत. ‘जवानी जाने मन’ या गाण्यावर शिव व अर्चना रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. अर्चनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शिवबरोबर डान्स करतानाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा>> वीणा जगतापच्या ‘त्या’ पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट, शिव ठाकरेचं नाव घेत म्हणाले “तो तुझी अजूनही…”

अर्चनाने शिव ठाकरेबरोबर डान्स केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. “हिला पण शिवचं फुटेज पाहिजे. मंडलीमध्ये नसणारे सगळे शिवच्या पाठीमागे लागले आहेत” अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “अर्चना आणि शिव फक्त डान्स करतानाच चांगले दिसतात”, असं म्हटलं आहे. अनेकांनी शिव ठाकरे व अर्चनाच्या डान्सचं कौतुक करत त्यांची जोडी चांगली असल्याचं म्हटलं आहे. “तुम्ही दोघे एकत्र छान दिसता”, अशी कमेंट एकाने केली आहे. शिव व अर्चनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ शाहरुख खानच्या ‘पठाण’ला देणार टक्कर? प्रदर्शनापूर्वीच ‘इतक्या’ कोटींची कमाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्चना गौतम व शिव ठाकरे ‘बिग बॉस हिंदी १६’च्या टॉप ५ फायनलिस्टपैकी एक होते. रॅपर एसमी स्टॅनने सर्वाधिक मतं मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं.तर शिव ठाकरे फर्स्ट रनर अप ठरला. अर्चनाला मात्र चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं.