‘बिग बॉस हिंदीच्या सोळाव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यंदाच्या पर्वात मराठमोळा शिव ठाकरेही सहभागी झाला होता. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीचा तो प्रबळ दावेदार मानला गेला होता. टॉप २मध्ये स्थान मिळवलेला शिव यंदाच्या पर्वाचा फर्स्ट रनर अप ठरला.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर येताच शिवने ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री वीणा जगतापबरोबरच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं. शिव म्हणाला, “बिग बॉस मराठी किंवा बिग बॉस १६मध्ये बनवलेली नाती माझ्यासाठी खूप खास आहेत. मी जे काही केलं ते मनापासून केलं. त्यामुळे त्याबाबत मला अजिबात खंत नाही. प्रेम विचार करुन केलं जात नाही”. वीणाबरोबर अजूनही संपर्कात आहेस का? असा प्रश्न शिवला विचारण्यात आला. यावर उत्तर देत “आम्ही आता रिलेशनशिपमध्ये नसलो तरी बिग बॉसमध्ये येण्याआधी मी तिच्याशी बोललो होतो” असं शिवने सांगितलं.

हेही वाचा>> Video: शिव ठाकरेबरोबर रोमँटिक डान्स करताना दिसली अर्चना गौतम, नेटकरी म्हणाले “सगळे त्याच्या…”

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिव ठाकरे व वीणा जगताप ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात शिव व वीणामध्ये जवळीक वाढली. त्यानंतर बराच काळ ते रिलेशनशिपमध्ये होते. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. परंतु, काही कारणांमुळे त्यांनी ब्रेकअप केलं. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा शिव विजेता ठरला होता.

हेही वाचा>> वीणा जगतापच्या ‘त्या’ पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट, शिव ठाकरेचं नाव घेत म्हणाले “तो तुझी अजूनही…”

शिवने अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. ‘एम टीव्ही’वरील रोडीज या शोचा तो स्पर्धक होता. शिव ठाकरेचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.