Bigg Boss 16 Grand Finale 2023 : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज रंगताना दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या टॉप ३ स्पर्धकांची नावे अखेर समोर आली आहेत. तर एका स्पर्धकाचा प्रवास संपला.

आज (१२ फेब्रुवारी) संध्याकाळी ७ वाजल्यापासून बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने बिग बॉसचे सूत्रसंचालन केले. बिग बॉसच्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी या स्पर्धकांनी टॉप ५ स्पर्धकांबरोबर विविध खेळ खेळले.
आणखी वाचा : Bigg Boss 16 Finale Live: एमसी स्टॅनला प्रियंका आवडते? सलमानच्या प्रश्नावर रॅपर म्हणाला, “बुबाची…”

बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले होते. त्यानंतर बिग बॉसने टॉप ५ सदस्यांना एक टास्क दिला. या टास्कवेळी त्यांना पाच जणांपैकी एकाला पाचव्या क्रमांकावर ठेवण्यास सांगितले. याबरोबर त्यांना मिळणाऱ्या रकमेतही वाढ होणार असल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी शिव ठाकरे, एम सी स्टॅन, प्रियंका चौधरी, आणि अर्चना या चौघांनी शालीन भानोत हे नाव घेतले. त्यामुळे टॉप ५ सदस्यांचे शालीन भानोतवर एकमत झाले. त्यानंतर शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी आणि अर्चना गौतम या चौघांमध्ये एक टास्क रंगला. यावेळी शिव ठाकरे, MC स्टेन आणि प्रियांका चहर चौधरी हे तिघे जण सुरक्षित झाले आणि टॉप ३ स्पर्धक ठरले. तर अर्चना गौतम हिचा बिग बॉसचा प्रवास संपला.