टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो बिग बॉसचं १६ पर्व आता संपलं आहे आणि यात पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारत विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं. अखेरीस शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यात चुरशीची लढत होती. पण त्यात शिव ठाकरेला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शिव ठाकरेने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अखेरच्या क्षणी हार झाल्यानंतर काय वाटलं हे शिव ठाकरेने सांगितलं आहे.

बिग बॉस मराठीचं विजेतेपद जिंकल्यानंतर शिव ठाकरे आता बिग बॉस १६चं विजेतेपद जिंकेल अशी आशा सर्वांनाच वाटत होती. मात्र असं झालं नाही. अखेरच्या क्षणी एमसी स्टॅनला विजेता घोषित करण्यात आलं आणि शिव ठाकरे रनरअप ठरला. ‘बिग बॉस’मुळे प्रचंड प्रसिद्धी मिळवलेला शिव ठाकरे हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याच्या चाहत्यांच्या तो सतत संपर्कात असतो.

आणखी वाचा : भारतातील सर्वात मोठ्या थाळीला सोनू सूदचं नाव; अभिनेत्याने फोटो शेअर करत दिली माहिती

नुकतंच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला. अंधेरीच्या एक कॅफेमध्येच शिव ठाकरेने चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी बऱ्याच चाहत्यांना त्याने उत्तरं दिली अन् काही चाहत्यांशी व्हिडिओच्या माध्यमातूनही संवाद साधला. दरम्यान शिव ठाकरेने एक मोठं सरप्राइजदेखील त्याच्या चाहत्यांना दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संभाषणादरम्यान शिवने लवकरच एका मोठ्या चित्रपटात काम करणार असल्याची घोषणा केली आहे. याबद्दल विशेष काहीच सांगितलं नसलं तरी या मोठ्या चित्रपटात शिव ठाकरे एक बड्या स्टारसह झळकणार आहे. यासाठी शिवचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत. लवकरच तो याबद्दल अधिकृत माहिती देणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. आता नेमका तो स्टार आणि तो चित्रपट कोणता? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.