बिग बॉसचं १६ वा सीझन सध्या चांगलाच गाजतोय. विशेषतः शालीन भानोत, टीना दत्ता, सौंदर्या शर्मा आणि शिव ठाकरे यांच्या नावाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. बिग बॉसच्या घरात जवळपास १०० पेक्षा जास्त कॅमेरा असल्याने अर्थातच घरातील प्रत्येक सदस्यांवर बिग बॉस लक्ष ठेवतात. पण अनेकदा यामुळे बिग बॉसच्या सदस्यांना लाजिरवाण्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. कधी कधी त्यांचे खासगी क्षण कॅमेऱ्यात कैद होतात. आताही असंच काहीसं शालीन आणि सौंदर्या यांच्याबरोबर घडलं आहे.

नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं आहे की सौंदर्या शर्मा अंघोळ करत असते. मात्र तिने बाथरुमचा दरवाजा आतून बंद केलेला नव्हता. त्याचवेळी शालीनही अंघोळ करायला जात असतो. त्या बाथरुममध्ये सौंदर्या आहे हे शालीनला माहीत नसल्याने तो चुकून बाथरुमचा दरवाजा उघडतो आणि मग पुढे जे काही झालं त्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

आणखी वाचा-Video : जोरदार भांडण अन् नंतर पॅनिक अटॅक, निमृत कौरच्या आजाराची शालीन भानोतने उडवली खिल्ली, पुढे काय घडलं पाहा?

सौंदर्या अंघोळ करत असताना शालीन चुकून तिच्या बाथरुमचा दरवाजा उघडतो. पण तो दरवाजा पूर्ण उघडत नाही. तो दरवाजा ढकलत असतानाच सौंदर्या आतून दरवाजा बंद करते आणि “तू दरवाजा ठोठावू शकत नाही का?” असं जोरात ओरडते. सौंदर्यचा आवाज ऐकून शालीनही थोडा घाबरतो आणि स्पष्टीकरण देत म्हणतो, “मला माहीत नव्हतं सौंदर्या. मी जाणून बुजून हे केलेलं नाही.”

आणखी वाचा- Bigg Boss 16: गौतम घराबाहेर पडताच सौंदर्याने बदललं टार्गेट, ‘या’ स्पर्धकाशी बदला घेण्यासाठी अर्चनाबरोबर केला प्लॅन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या सगळ्यानंतर शिव ठाकरे सौंदर्याला यावरून खूप चिडवतो आणि ती देखील मस्करी समजून त्यावर हसताना दिसते. शिव तिला म्हणतो, “तो कडी न लावल्याचा मुद्दा नेमका काय?” त्यावर सौंदर्याने तो तिला चिडवत असल्याचं समजून घेतलं आणि शालीनचं वागण्याला वादाचा मुद्दा न बनवता चांगल्याप्रकारे संपूर्ण प्रकरण हाताळलं.