‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाच्या ग्रँड फिनालेला आता अवघा एक महिना उरला आहे. या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातून साजिद खान, श्रीजिता डे आणि अब्दु रोझिक हे तीन सदस्य बाहेर पडले. गेल्या आठवड्यात स्पर्धकांच्या घरातून एकेक सदस्य बिग बॉसमध्ये आले होते. यामुळे घरातील सदस्य भावूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, घरातून बाहेर पडल्यानंतर कुटुंबीयांनी शोबद्दल मत व्यक्त केलंय. शालिन भानोतच्या आईनेही त्याच्या आणि टीना दत्ताच्या नात्यावर भाष्य केलंय.

‘इंडिया टुडे’शी बोलताना शालिन भानोतची आई सुनिता भानोत म्हणाल्या, “एक प्रेक्षक म्हणून पाहिल्यास शालिनच्या फीलिंग्स कॅमेऱ्यासाठी कधीच नव्हत्या. त्याने खूपदा टीनाचं समर्थन केलंय, तिला पाठिंबा दिला आहे. हे त्यांच्या बाँडिंगचं सौंदर्य आहे. मैत्री हे खूप सुंदर नातं असतं आणि शालिनने ती मैत्री निभावली. जर प्रेक्षकांनी याला लव्ह अँगलचा टॅग दिला तर ते तसं असेलच असं नाही.”

‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच साजिद खानने केली नव्या चित्रपटाची घोषणा

“मैत्री ही मैत्री असते. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी एकत्र राहतो, तेव्हा मैत्री होते. तुम्ही या जगात एकटे राहूच शकत नाही. तुम्हाला कुणाची तरी गरज असते. कधी कधी कुणासोबत मैत्री जास्त घट्ट असते, तर कुणाबरोबर कमी असते. पण त्याला एखाद्या नात्याचा टॅग देऊन जज करणं योग्य नाही. त्यामुळे शालिन व टीनाच्या नात्याला कोणतंही नाव देणं योग्य नाही,” असं सुनिता भानोत म्हणाल्या.

View this post on Instagram

A post shared by Shalin Bhanot (@shalinbhanot)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वात शालिन भानोत आणि टीनाचं नातं खूप चर्चेचा विषय राहिलं. शालिनने आपलं टीनावर प्रेम असल्याचं म्हटलं होतं, तर टीनानेही प्रेमाची कबुली दिली होती, पण नंतर मात्र शालिन आपला फक्त मित्र असल्याचं ती म्हणाली. त्यामुळे शालिन व टीनाचं नक्की काय चाललंय, असा प्रश्न घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही पडला होता. अशातच आता ते दोघे एकमेकांशी बोलणंही टाळतात.