‘बिग बॉस १६’मधील तीन सदस्यांना एकाच वेळी शोमधून बाहेर पडावं लागलं. साजिद खान, अब्दू रोझिक, श्रीजिता हे तीन सदस्य घराबाहेर आले. आता ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये नवे वाद-विवाद, भांडणं सुरु झाली आहेत. या शोच्या सुरुवातीपासूनच चर्चेत असणारी टीना दत्ता व शालीन भानोत ही जोडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आता या दोघांमध्ये वैर पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘वेड’ची कमाई पाहून भारावली रितेश देशमुखची वहिनी, म्हणाली, “४१ कोटी रुपयांचा…”

टीना-शालीनचं जोरदार भांडण

मैत्री, प्रेम असंच काहीसं शालीन व टीनाचं नातं होतं. पण आता दोघं एकमेकांचा तिरस्कार करताना दिसत आहेत. टिकट टू फिनाले विकमध्ये ‘बिग बॉस’ने निमृत कौर घराची नवी कॅप्टन असेल असं घोषित केलं. पण यादरम्यान निमृतचं कॅप्टनपद काढून घेण्याचा टास्कही घरातील सदस्यांना देण्यात आला. यावेळी निमृतच कॅप्टन म्हणून योग्य आहे असं शालीन म्हणाला. शालीनचं हे वक्तव्य ऐकून प्रियांका व टीना त्याच्यावर भडकल्या.

यावेळी टीना व शालीनमध्ये जोरदार भांडण होतं. शालीन टीनाला म्हणतो, “तूच सगळं प्लॅनिंग केलं आहेस. तू किती खोटारडी आहेस. एक मुलगा तुला सोडून गेला की तू दुसऱ्या मुलाला चिकटते.” शालीनचं हे बोलणं ऐकून टीनाला राग अनावर होतो. टीना म्हणते, “तोंड सांभाळून बोल. स्वतःच्या पत्नीची इज्जत केली नाही. माझ्या चारित्र्यावर बोलत आहेस. घाणेरडा मुलगा मला याचा फरक पडत नाही. तुझ्या कानाखाली मारेन.”

आणखी वाचा – Video : पाठ दाबली, अंगावर बसली अन्…; प्रार्थना बेहरेचा नवऱ्याबरोबरचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल, सहकलाकार म्हणाली, “दाखवायचे दात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुझं हेच सत्य आहे.” असं शालीन टीनाला म्हणतो. दरम्यान या भांडणानंतर मला याच आठवड्यामध्ये घराबाहेर जायचं आहे असं टीना म्हणते. दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. शालीन व टीनाचं हे भांडण आता कुठपर्यंत पोहोचणार हे पाहावं लागेल.