‘बिग बॉस हिंदी’चं १६वं पर्व गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या पर्वामध्ये मराठमोळा शिव ठाकरे प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरलेला शिव हिंदी ‘बिग बॉस’मध्येही प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करत आहे.

शिव ठाकरे व वीणा जगतापचे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूर जुळले होते. त्यांची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतरही बराच वेळ ते रिलेशनशिपमध्ये होते. परंतु, नंतर काही काळाने शिव व वीणा एकमेकांपासून वेगळे झाले. आजही अनेकदा शिव व वीणाबद्दलच्या नात्याबाबत माध्यमांमध्ये चर्चा होताना दिसतात. मध्यंतरी वीणा ‘बिग बॉस १६’मध्ये येणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.

हेही वाचा>> “माझं अभिनेत्रीबरोबर…”, ‘बिग बॉस मराठी’ फेम प्रसाद जवादेचा लग्नाबाबत मोठा खुलासा

हेही वाचा>>सोनू सूदने केलं प्राजक्ता माळीचं कौतुक, म्हणाला…

‘बिग बॉस’च्या घरात फॅमिली वीक सेलिब्रेट होत आहे. शिवच्या आईने त्याला भेटण्यासाठी घरात एन्ट्री घेतली होती. त्यानंतर शिवच्या आईने टेली चक्करला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना वीणा जगताप व शिवच्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना त्या स्पष्टपणे “हा विषय आता संपला आहे”, असं म्हणाल्या. पुढे त्यांनी “वीणा एक चांगली मुलगी आहे. बिग बॉसच्या घरात ती शिवची मैत्रीण म्हणून राहिली. नंतर तिने शिवबरोबर लग्न करण्याचा ड्रामाही केला”, असं म्हणत वीणा जगतापबाबत गंभीर वक्तव्य केलं आहे.

हेही पाहा>>Photos: खणाचा ड्रेस अन् हलव्याचे दागिने, मकर संक्रांतीसाठी ‘परी’चा खास लूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिव ठाकरे हा ‘बिग बॉसच्या हिंदी’च्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी एक आहे. ‘बिग बॉस मराठी’बरोबरच तो याआधी रोडिज या रिएलिटी शोमध्येही सहभागी झाला होता.