‘बिग बॉस हिंदी’चं १६वं पर्व गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मराठमोळा शिव ठाकरे बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. शिव त्याच्या स्वभावाने व उत्कृष्ट खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातही सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. ‘बिग बॉस’च्या घरात त्याचे अभिनेत्री वीणा जगतापसह प्रेमसंबंध जुळले होते. परंतु, नंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले. ब्रेकअप झाल्यानंतरही शिवचं नाव अनेकदा वीणाबरोबर जोडलं गेलं होतं. त्यानंतर आता ‘बिग बॉस हिंदी’च्या घरात शिव ठाकरे व निमृत कौर यांच्यात जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच प्रसाद जवादे-अमृता देशमुखचं डेटिंग, पोस्ट शेअर करत म्हणाले…

‘कलर्स’च्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन शिव व निमृतचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शिव-निमृत एकमेकांशी भांडताना व हक्क गाजवताना दिसत आहेत. “मी कोणाबरोबर जोडली गेली असेन तर तो तू आहेस”, असं निमृत म्हणते. त्यावर शिव उत्तर देत “तू खूप हळवी आहे, हे मला माहीत आहे”, असं म्हणतो. “मग मी माझ्यावर हक्क दाखवते, तसं तू का दाखवत नाहीस?”, असं निमृत शिवला विचारते.

हेही वाचा>> “दोन मुलांची आई असूनही…”, राज ठाकरेंच्या पत्नीने जिनिलीयाबाबत केलेलं विधान चर्चेत

“जेव्हा मी चिडलेला असतो, तेव्हा तू माझी समजूत काढायला येत नाहीस. पण जेव्हा तू रागात असते, तेव्हा मी तुला लाडीगोडी लावतो, हे तुला दिसत नाही का?”, असं शिव निमृतला म्हणतो. त्यानंतर निमृत शिवला सॉरी म्हणून त्याला मिठी मारते. या व्हिडीओमध्ये नंतर निमृत “इस प्यार को क्या नाम दू”, हे गाणं गुणगुणतानाही दिसत आहे.

हेही पाहा>> Photos: रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचं चाहत्यांना ‘याड लागलं’; नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’चाही रेकॉर्ड मोडला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिव व निमृतच्या या व्हिडीओमुळे त्या दोघांमध्ये जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. ‘बिग बॉस’च्या घरात शिव व निमृतमध्ये नेमकं काय नात आहे, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.