‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वामुळे शिव ठाकरे नावारुपाला आला. या पर्वाचं विजेतेपद शिवने पटकावलं. आता ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफीही शिवच्याच हातात असावी असं प्रेक्षकांसह त्याच्या चाहत्यांचंही म्हणणं आहे. शिवच्या विजेतेपदासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत. तर मराठी कलाकारांनीही शिवला वोट करा असं सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलं आहे.

आणखी वाचा – शिव ठाकरेसाठी महेश मांजरेकरांसह इतरही मराठी कलाकार एकवटले, तर ‘बिग बॉस’ स्टार्सचे आई-वडील म्हणतात, “आमचा लेक…”

शिवला कलाक्षेत्र तसेच राजकीय क्षेत्रामधून पाठिंबा मिळत असताना एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस तक’ या फॅनपेजद्वारे एक ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीटद्वारे प्रियांका चौधरी व एमसी स्टॅन टॉप २मध्ये असणार आहेत असं म्हटलं जात आहे. तर शिवबाबतही वक्तव्य करण्यात आलं आहे.

आणखी वाचा – वीणा जगतापला अजूनही विसरु शकला नाही शिव ठाकरे, ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “तिला…”

शिवला बाजूला केलं जात आहे असं या ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं आहे. पण सध्यातरी शिवला प्रेक्षकांकडून तसेच कलाकारांकडून बराच पाठिंबा मिळत आहे. शिवाय शिवच जिंकणार असा विश्वास त्याच्या आई-वडिलांनीही व्यक्त केला आहे. याआधी निमृतला या घरामधून प्रेक्षकांच्या लाइव्ह वोटनुसार बाहेर पडावं लागलं.

आणखी वाचा – Video : …अन् बोलता बोलता जमिनीवर कोसळली राखी सावंत, पती आदिल खानच्या अटकेनंतर अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शोमधील शेवटच्या नॉमिनेशन कार्यामध्ये सुम्बुल तौकीरला घराबाहेर जावं लागलं. आता घरामध्ये फक्त शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी, शालीन भानोत व अर्चना गौतम हे पाच सदस्य राहिले आहेत. शिवला मराठी कलाकारांचा पाठिंबा मिळत आहे. महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, मेघा धाडे, माधव देवचक्के, हिना पांचाळ यांसारख्या मंडळींनी शिवसाठी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर केली आहे. शिवला अधिकाधिक वोट करा असं या कलाकार मंडळींनी म्हटलं आहे.