रॅपर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस १६’ शोचं विजेतेपद मिळवत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. शिव ठाकरे किंवा प्रियांका चौधरी या शोचं विजेतेपद पटकावणार असं बोललं जात होतं. मात्र एमसीने या सगळ्यांना मागे टाकत बाजी मारली. मुळचा पुण्याचा असलेला एमसी रॅपर अवघ्या २३ वर्षांचा आहे. आता त्याच्याकडे लाखो रुपयांची संपत्ती आहे. पण याआधी एमसीचं आयुष्य काही वेगळंच होतं.

आणखी वाचा – आदिल खानच्या म्हैसूरमधील घरी पोहोचली राखी सावंत, पण तिथे घडलं भलतंच, म्हणाली, “माझे सासू-सासरे पळून गेले आणि…”

पुण्यातील एका झोपडपट्टीमध्ये एमसी लहानाचा मोठा झाला. पण एमसी या भागातील मुलांबरोबर राहून वाईट मार्गाला जात होता. याचबाबत त्याने स्वतःच राज शमानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. एमसीने योग्यवेळी त्याच्या आई-वडिलांनी घेतलेल्या निर्णयाबाबतही सांगितलं.

एमसी म्हणाला, “माझे काही मित्रच होते. ते वाईट मार्गाला जात होते. त्यांच्याबरोबर मलाही काही वाईट सवयी लागल्या होत्या. माझ्या घराच्या पाठीमागेच माझी शाळा होती. माझं तसेच माझ्या मित्रांचं असं होतं की, अजाना सुरू झालं की शाळेतून निघायचं. शाळा सुटायच्या आधीच आम्ही बाहेर पडायचो”.

आणखी वाचा – “बायकोला पहिल्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं अन्…” ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तो म्हणाला, “शाळेमध्ये गुटखा खाऊन थुंकणं असे प्रकार सुरु असायचे. तेव्हा माझ्या कुटुंबियांकडे फारसे पैसेही नव्हते. झोपडपट्टीमध्ये राहत असल्याने सकाळी उठून आमचं काहीतरी वेगळंच सुरू असायचं. आई-वडिलांनी एकदा सगळं बघितलं आणि मला आर्मी शाळेमध्ये प्रवेश मिळवून दिला. मलाही काही वाईट सवयी लागल्या होत्या. चोरी वगैरे असे प्रकार झोपडपट्टीमध्ये सुरू असायचे.” एमसीच्या लोकप्रियतेमध्ये आता प्रचंड वाढ झाली आहे.