‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर एमसी स्टॅन चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरही पुण्याच्या एमसी स्टॅनचीच हवा आहे. ‘बिग बॉस’ विजेत्या रॅपर अनेक कार्यक्रम व पार्ट्यांमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. एमसी स्टॅनचा एका पार्टीदरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एमसी स्टॅन हा ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होता. घरातील मंडलीबरोबरच स्टॅनच्या स्टाइलचीही चर्चा होत होती. रॅपरच्या गाण्यांबरोबरच त्याच्या हटके स्टाइलनेही तरुणाईला वेड लावलं. स्टॅनच्या गळ्यातील चेन व ८० हजारांच्या शूजने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. एका पार्टीदरम्यान स्टॅनने त्याचे ८० हजारांचे शूज पापाराझींसमोर फ्लॉन्ट केलं. परंतु, त्याच्या या कृतीमुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन एमसी स्टॅनचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> ‘लक्ष्य’ फेम अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रचा ‘शुभविवाह’! समुद्रकिनारी बांधली लग्नगाठ

हेही वाचा>> नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, पोलिसांत केली तक्रार दाखल, म्हणाली…

स्टॅनच्या पार्टीतील या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. “छपरी म्हणजे काय हे बिग बॉस १६ च्या विनरकडे बघून कळलं” असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “हे शूज मी तुला ५०० रुपयांत आणून देईन”, अशी कमेंट केली आहे. “चलता फिरता प्राइज टॅग” अशी कमेंटही एका नेटकऱ्याने केली आहे. “८० हजार…मी हेच शूज दोन हजारात घेऊन देतो”, असंही एकाने म्हटलं आहे. तर एकाने “८० हजाराचे शूज आहेत हे सारखं सांगायची गरज नाही” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा>> Video: “आदिल खान बायसेक्शुअल, त्याचा न्यूड व्हिडीओ…” राखी सावंतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “त्याच्या डोक्यावर केस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनला लॉटरी लागली आहे. स्टॅनला अनेक ब्रॅण्डकडून ऑफर मिळाल्या आहेत. याशिवाय त्याच्या सोशल मीडिया फॉलोवर्समध्येही प्रचंड वाढ झाली आहे. एवढंच नाही तर स्टॅनला बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद-वाजिद यांच्याकडूनही गाण्याची ऑफर मिळाली आहे.