टेलिव्हीजनवरील लोकप्रिय वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ नंतर सलमान लवकरच ‘बिग बॉस’चा १७ वा सीझन घेऊन येणार आहे. १५ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस १७’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यंदाच्या बिग बॉसच्या घरात कोणकोणते सहभागी होणार याबाबतची उत्सुकता प्रेक्षकांनी लागली आहे. आता बिग बॉस सुरु होण्याच्या दोन दिवस अगोदर स्पर्धकांची नावांची यादी समोर आली आहे.

हेही वाचा- “आमटी भात ते मेक्सिकन…”; अमृता देशमुखने शेअर केला अमेरिकेतील अनुभव, म्हणाली, “अनेक फॅमिली…”

‘बिग बॉस ओटीटी’चं दुसरं पर्व चांगलच गाजलं होतं. या पर्वानंतर आता सगळ्यांच लक्ष ‘बिग बॉस’ १७ कडे लागलं होतं. यंदाचे बिग बॉस हे दरवर्षीपेक्षा वेगळं असणार आहे ‘बिग बॉस १७’ची यंदाची थीम सिंगल विरुद्ध कपल आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना आता सिंगल विरुद्ध कपल लढत बघायला मिळणार आहे.

बिग बॉस १७ मध्ये हे आहेत स्पर्धेक

बिग बॉस १७ मध्ये स्पर्धेक म्हणून अंकिता लोखंडे आणि विक्की जैन, ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट, इशा मालवीय आणि अभिषेक कुमार, मुनव्वर फारूकी, अनुराग डोभाल उर्फ ​​यूके राइडर, मन्नारा चोपड़ा, जिग्ना वोरा, सनी आर्य उर्फ ​​तहलका प्रैंक, मनस्वी ममगई, ऋषि धवन यांच्या नावावर शिक्कामोर्तेब झाला आहे. तर अरमान मलिक आणि कृतिका/पायल मलिक, कंवर ढिल्लों, एल्विश यादवची एक्स गर्लफ्रेंड किर्ती मेहरा, टिकटॉकर फैज़ बलूच, जय सोनी, संदीप सिकंद यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

हेही वाचा- “मला पुन्हा लग्न करायचं आहे”, घटस्फोटानंतर तेजश्री प्रधानने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “होणारा नवरा…”

दरम्यान बिग बॉसमध्ये जाण्यासाठी अंकिता लोखंडे आणि तिचा पती विक्की जैनने जोरदार तयारी केली असल्याची माहिती समोर आली आहे. या शोमध्ये तिचा ड्रेस रिपीट होऊ नये म्हणून अंकिता आणि विक्कीने तब्बल २०० ड्रेस खरेदी केले असल्याचे सांगण्यात येत आहे