Bigg Boss Season 17 Grand Finale Updates: ‘बिग बॉस १७’चा विजेता घोषित होण्यासाठी अवघे काही मिनिट बाकी आहेत. अरुण माशेट्टी, अंकिता लोखंडे या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. आता मनुव्वर फारुकी, मनारा चोप्रा आणि अभिषेक कुमार या टॉप तीन सदस्यांमधून कोण विजेता ठरणार? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

‘बिग बॉस १७’च्या महाअंतिम सोहळ्याला सर्व सदस्य उपस्थित राहिले आहेत. पण अनुराग डोभाल व खानजादीने सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे. दोघं ही गैरहजर आहेत. अशातच सलमान खान अनुरागची खिल्ली उडवताना पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17 Grand Finale: विकी जैनचा सना, आयशा खानबरोबर ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

अनुराग डोभाल ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यापासून ‘बिग बॉस’ आणि सलमान खानच्या विरोधात सातत्याने बोलताना दिसत आहे. तसेच ‘बिग बॉस’चा विजेता आधीपासून निश्चित झालेलं आहे. ‘बिग बॉस’ बायस्ड (पक्षपाती) आहे, असे अनेक आरोप अनुरागने केले आहेत. याच पार्श्वभूमीवरून सलमान महाअंतिम सोहळ्यात अनुरागची खिल्ली उडवताना दिसला. याचा व्हिडीओ ‘बिग बॉस १७ लाइव्ह’ या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओत, सलमान खान म्हणतोय, “अनुरागने काही म्युझिक व्हिडीओ बनवले आहेत. अरे अनुराग माहितेय, याच सीझनमध्ये होताना तो? तो ‘बिग बॉस’ आणि माझ्यावर इतका नाराज आहे की तो आज आला नाही. त्याने ‘बिग बॉस’च्या विरोधात इतकं काही पोस्ट केलं. आज जर तो इथे बसला असता तर मग…”

हेही वाचा – Bigg Boss 17: ग्रँड फिनालेनिमित्त विकी जैनची अंकिता लोखंडेसाठी खास पोस्ट; नेटकरी म्हणाले, “तू बरोबर होतास, तिने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माहितीनुसार, अंकिता लोखंडेनंतर मनारा चोप्रा ‘बिग बॉस १७’च्या स्पर्धेतून बाहेर होणार आहे. मुनव्वर आणि अभिषेक हे टॉप दोन सदस्य असणार आहेत. त्यामुळे आता या दोघांमधून कोण बाजी मारतंय? हे पाहणं महत्त्वाचं आहे.