‘बिग बॉस 17’च्या अंतिम फेरीला सुरुवात झाली असून प्रेक्षकांना अंकिता, मुनव्वर, मनारा, अभिषेक यांच्या रुपात यंदाचे टॉप चार स्पर्धक भेटले आहेत. आता या चार जणांमध्ये कोण बाजी मारणार व कोणता स्पर्धक १७ व्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

महाअंतिम सोहळ्यात ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खानने टॉप ४ मध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी भाईजानने अंकिता लोखंडेच्या सासूबाईंना खास दिला. हा सल्ला नेमका काय आहे? जाणून घेऊयात…

हेही वाचा : Bigg Boss 17 च्या महाअंतिम सोहळ्याकडे ‘या’ दोन स्पर्धकांनी फिरवली पाठ, कोण आहे ते?

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता व विकीमध्ये टोकाचे वाद झाले होते. यानंतर पार पडलेल्या फॅमिली वीक टास्कमध्ये अंकिताच्या सासूबाईंनी अभिनेत्रीच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. शिवाय अंकिता-विकीच्या लग्नाला घरून संमती नव्हती असंही विधान रंजना जैन यांनी केलं होतं. या वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांत त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. तसेच याआधी त्यांनी लेक विकी जैन ट्रॉफी जिंकावा अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु, काही दिवसांपूर्वीच विकीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला. त्यामुळे नुकत्याच सुरू असलेल्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खानशी संवाद साधताना रंजना जैन यांनी “माझी सून जिंकली तर मला खूप जास्त आनंद होईल” असं म्हटलं आहे.

हेही वाचा : ‘बिग बॉस’ फेम अभिषेक कुमारचं खरं नाव माहितीये का? आलिया भट्टच्या चित्रपटात साकारलेली महत्त्वाची भूमिका, जाणून घ्या…

रंजना जैन यांची इच्छा ऐकल्यावर अभिनेता व ‘बिग बॉस’ होस्ट सलमान खानने विकीच्या आईला खास सल्ला दिला आहे. भाईजान म्हणाला, “गेल्या काही दिवसांत तुम्ही खूप प्रसिद्ध झाला आहात. त्यामुळे मला असं वाटतं की, पुढच्या सीझनमध्ये तुम्ही या शोमध्ये सहभागी झालं पाहिजे. या लोकांनी (विकी-अंकिता) तसं काहीच खास केलं नाही. पण, तुम्ही आलात तर नक्कीच सीझन गाजवाल याची मला खात्री आहे.”

हेही वाचा : Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे ‘बिग बॉस’ जिंकणार का? सासूबाई म्हणाल्या, “ती घरी…”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान खानने विकीच्या आईला दिलेला सल्ला ऐकून प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. तसेच रंजना जैन यांनी यावेळी अभिनेत्याचं व त्याच्या होस्टिंग स्टाइलचं भरभरून कौतुक केलं. याशिवाय अंकिताच्या सासूबाईंनी खास शायरी म्हणत सलमानचं कौतुक देखील केलं. आता ‘बिग बॉस’च्या १७ व्या सीझनचा विजेता कोण होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.