‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘बिग बॉस’ हिंदीचे १७ वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत आता अधिकृत घोषणाही झाली आहे. १७ व्या पर्वाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हे पर्व आधीच्या पर्वांपेक्षा नक्कीच वेगळं आणि खास असणार आहे.
कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हा मनोरंजक टीझर शेअर करण्यात आला आहे. त्याला त्यांनी “यावेळी बिग बॉस दाखवणार वेगळे रंग, जे पाहून तुम्ही सर्व थक्क व्हाल. बिग बॉस १७ लवकरच पहा, फक्त कलर्सवर…” असं कॅप्शन दिलंय.
या टीझरमध्ये सलमान खान म्हणतो, “आतापर्यंत तुम्ही बिग बॉसचे फक्त डोळे पाहिले आहेत, आता बिग बॉसचे तीन अवतार पाहायला मिळणार आहेत. दिल, दिमाग आणि दम सध्या मी एवढेच सांगू शकतो.”
दरम्यान, बिग बॉस सीझन १७ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोमोसोबत शोच्या ग्रँड प्रीमियरची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु १५ ऑक्टोबरपासून हा शो सुरू केला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे. १७ व्या पर्वात कोणते सेलिब्रिटी दिसतील, याबाबत लवकरच माहिती समोर येईल.