Bigg Boss 18: नुकताच झालेला ‘फॅमिली वीक’ चांगलाच गाजला. प्रत्येक सदस्याच्या कुटुंबातील मंडळी एक दिवस ‘बिग बॉस’च्या घरात राहिले होते. यावेळी आरोप-प्रत्यारोपचं सत्र पाहायला मिळालं. चाहत पांडेची आई आणि विवियन डिसेनच्या पत्नीमुळे ‘फॅमिली वीक’ची चांगलीच चर्चा झाली. पण यावरून वीकेंडच्या वारला सलमान खानने चाहतची पोलखोल केली.

चाहत पांडेच्या आईने ‘फॅमिली वीक’मध्ये अविनाश मिश्रावर गंभीर आरोप केले होते. तो स्त्रीलंपट असल्याचं म्हटलं होतं. यावरून वीकेंडच्या वारला सलमान खानने चाहतची शाळा घेतली. एवढंच नाहीतर ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी चाहतचा एक फोटो सगळ्यांसमोर आणला. ज्यामध्ये तिच्याबरोबर एक केक होता. ज्यावर लिहिलं होतं, ‘नात्याला ५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शुभेच्छा…माझं प्रेम.’ हे पाहून चाहत हैराण झाली. यावेळी अविनाश तिला स्वीकार कर असं सांगत होता. पण चाहतने शेवटपर्यंत बॉयफ्रेंड असल्याचं स्वीकारलं नाही. पण सलमानने एक हिंट दिली. त्यामुळेच सध्या चाहत एका गुजराती मुलाला डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे. तसंच चाहतचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये तिने एका मुलाला डेट करत असल्याचं म्हटलं आहे. आता चाहतच्या नात्यासंबंधीत एक वेगळाचा खुलासा झाला आहे.

हेही वाचा – अलका कुबल यांनी सांगितली पायलट लेकीबरोबरच्या ‘या’ फोटोमागची गोष्ट, म्हणाल्या, “जेव्हा विमान थांबलं…”

हेही वाचा – शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो

चाहतच्या आईचा नात्याला विरोध

‘इंडिया फोरम्स’च्या वृत्तानुसार, चाहत पांडे एका मुलाला डेट करत आहे. पण तो तिच्या जातीचा नाहीये. त्यामुळे चाहतच्या नात्याला तिच्या आईचा विरोध आहे. ‘बिग बॉस’मध्ये जाण्याआधी चाहतने एक पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये तिने डेट करत असलेल्या मुलाची आईबरोबर ओळख करून दिली होती. पण तिच्या आईने हे नातं स्वीकारण्यास नकार दिला. कारण चाहतच्या आईला त्यांच्यात जातीमधील मुलाबरोबर तिचं लग्न करायचं आहे. चाहत डेट करत असलेला मुलगा गुजराती आहे.

हेही वाचा – रिचा चड्ढा-अली फैजल चिमुकल्या लेकीशी ‘असा’ साधतात संवाद, तिच्यासाठी गातात ‘हे’ गाणं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा १४वा आठवडा सुरू झाला आहे. १३व्या आठवड्यात चाहतची खास मैत्रीण कशिश कपूर घराबाहेर झाली. प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे कशिश एविक्ट झाली. यावेळी चाहत भावुक झालेली पाहायला मिळाली. सध्या ‘बिग बॉस’चं पर्व अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला दोन आठवडे बाकी आहेत. १९ जानेवारीला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता घोषित होणार आहे.