Bigg Boss Season 18 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वानंतर लगेचच हिंदीतील ‘बिग बॉस’चं १८वं पर्व मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची चर्चा सुरू आहे. अखेर ६ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस’चं १८वं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अलीकडेच सलमान खानच्या आलेल्या प्रोमोमधून शोच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली. ६ ऑक्टोबर रात्री ९ वाजता ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर होणार आहे; जो ‘कलर्स टीव्ही’ चॅनेल आणि ‘जिओ सिनेमा’वर पाहता येणार आहे. सध्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात कोणते कलाकार स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच सहा स्पर्धकांवर शिक्कामोर्तब झाल्याचं समोर आलं आहे.

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात झळकणाऱ्या ११ कलाकारांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. निया शर्मा, शोएब इब्राहिम, धीरज धूपर, नायरा बनर्जी, शिल्पा शिरोडकर, मीरा देवस्थळे, सायली साळुंखे, शांति प्रिया, अविनाश मिश्रा, देव चंद्रिमा सिंघा रॉय, चाहत पांडे या नावांची चर्चा होत आहे. पण यापैकी सहा नाव निश्चित झाल्याचं म्हटलं आहे. यात एक मराठी चेहरा देखील दडलेला आहे.

हेही वाचा – “माझ्या वाट्याला ‘लापता लेडीज’च्या…”, चित्रपट ‘ऑस्कर’ला गेल्यावर छाया कदम यांची पोस्ट

चाहत पांडे, धीरज धूपर, नायरा बनर्जी, शोएब इब्राहिम, निया शर्मा, शिल्पा शिरोडकर ही सहा नाव ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वासाठी निश्चित झाली आहेत. या पर्वात शिल्पा शिरोडकर हा मराठी चेहरा पाहायला मिळणार आहे. ८० आणि ९०चं दशक गाजवणाऱ्या शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात एन्ट्री करणार आहेत. शिल्पा शिरोडकर यांचं खास नातं दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूशी आहे. महेश बाबू त्या मेव्हूणी आहेत. शिल्पा शिरोडकर यांची सख्खी बहीण नम्रता शिरोडकर महेश बाबूची पत्नी आहे.

हेही वाचा – Video: “या दोघांच्या स्वभावामुळे माझी झोप उडाली…”, कुशल बद्रिकेने बायको अन् मुलाचा व्हिडीओ केला शेअर; म्हणाला, “यावर उपाय…”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस १८’ची थीम

यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वात बरंच वेगळं काहीतरी पाहायला मिळणार आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यावर आधारित ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची थीम आहे. त्यामुळे नेमकं शोमध्ये काय असणार आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.