Bigg Boss 18: ६ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झालेला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा प्रवास आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. उद्या, १९ जानेवारीला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक पोलच्या माध्यमातून कोण विजयी होणार? यासंदर्भात तर्क-वितर्क लावले जात आहेत. कोणी विवियन डिसेना जिंकणार म्हणत आहे, तर कोणी करणवीर मेहरा जिंकणार म्हणत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा महाविजेता नेमका कोणता सदस्य होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यापूर्वी आणखी एक पत्रकार परिषद पार पडली. पण यावेळी एक ट्विस्ट आहे. ते म्हणजे पत्रकारांच्या तिखट प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सदस्यांचे समर्थक उपस्थित राहिले आहेत. रजत दलाल पाठिंबा देण्यासाठी ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता एल्विश यादव उपस्थित राहिला. यावेळी रजतसंदर्भातील प्रश्नांची एल्विश परखड उत्तरं देताना दिसला. याचा प्रोमो सध्या व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “तब्बल ९० दिवसानंतर मिळणारं पेमेंटही…”, मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणाला…

या प्रोमोमध्ये एक पत्रकार एल्विश यादवाला विचारते की, रजतला तू पाठिंबा देत आहेस. तो सतत म्हणतो, फाडून टाकेन, मारून टाकेन. माध्यमांसमोर म्हणाला की, मी माध्यमांना मानत नाही. मी आक्रमकवृत्तीचा आहे. जर तू रजतला पाठिंबा देत आहेस. तो जिंकण योग्य असेल का? यावर एल्विश म्हणाला, “हा रिअ‍ॅलिटी शो आहे. इथे फिक्शन नाहीये; जिथे बनावट रुप दाखवून मी खूप चांगला आहे वगैरे म्हणू. जे आहे तेच तो दाखवणार आहे. तुमच्या मतांनुसार माझ्या मैत्रीमध्ये बदल होणार नाही. माझा मित्र आहे. मी त्याला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, डंके की चोट पे.”

हेही वाचा – ‘झी मराठी’च्या नव्या थ्रिलर मालिकेत झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी! तर, खलनायिका साकारणार…; प्रोमोत दिसली संपूर्ण स्टारकास्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘मिड वीक एविक्शन’ पार पडलं. यावेळी शिल्पा शिरोडकर घराबाहेर झाली. आता ‘बिग बॉस’च्या घरात विवियन डिसेना, करणवीर मेहरा, चुम दरांग, अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि रजत दलाल हे सहा सदस्य आहेत. या सहा जणांमधून कोण ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या ट्रॉफीचा हक्कदार होतंय? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.