Bigg Boss 19 Updates : ‘बिग बॉस’ आणि वाद हे जणू एक समीकरणच आहे. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वात स्पर्धकांचं एकमेकांशी भांडण होत असतं. कधी टास्कवरून तर कधी घरातील कामावरून… स्पर्धक एकमेकांशी वाद घालताना दिसतात. कधीकधी एखादं साधं भांडण हाणामारीपर्यंत सुद्धा जातं. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. अशातच नुकताच ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘बिग बॉस १९’ सुरू होऊन काही आठवडे झाले नाहीत, तोच घरात वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे. अशातच घरातील कामावरून स्पर्धकांमध्ये खटके उडाले आहेत. याचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
सध्या घरचा कॅप्टन बसीर अली आहे आणि त्याने घरातील कामावरून मराठमोळा स्पर्धक प्रणित मोरेला सुनावलं. कामावरून बोलल्याबद्दल दोघांत सुरूवातीला बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर नंतर जोरदार भांडणात झालं. नेमकं काय झालं? चला जाणून घेऊ…
कॅप्टन बसीर प्रणितला त्याने न केलेल्या कामाबद्दल बोलतो. तेव्हा तो असं म्हणतो की, टेबलसुद्धा तो एकदाच साफ केलं आहेस”. त्यावर प्रणितही त्याला उत्तर देत मी माझं काम केलं आहे. तो जिशानलाही बोल”. त्यानंतर बसीर पुन्हा प्रणितवर डाफरत “मी आधी काम करणार. तो नंतर करणार ही कोणी ठरवलं. मी जिशानला सुद्धा तुझ्यासमोरच ओरडत आहे.” त्यानंतर प्रणित पुन्हा मी माझं काम नंतर करेन असं बसीरला म्हणतो.
पुढे बसीर प्रणितला “तुला तुझं काम आत्ताच करावं लागेल” असं ठणकावून सांगतो. मात्र बसीरला विरोध करत प्रणितसुद्धा असं म्हणतो की, “काहीही होऊदे मी माझं काम आता करणार नाही.” त्यावर बसीर रागात येऊन “नंतर प्रॉब्लेममध्ये येशील. उगाच जिद्द करू नकोस.” असं बोलतो. त्यावर प्रणितही त्याला बिनधास्त उत्तर देत, “मी माझ्या पद्धतीनेच काम करणार” असं म्हणतो. मग बसीरलाही त्याला धमकीवजा इशारा देत, “तू तुझ्या पद्धतीने काम करशील तर बघू काय होतं ते” असं म्हणतो.
बिग बॉस १९ प्रोमो
बसीर अलीने प्रणित आणि झीशान त्यांच्या कामाची जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडत नसल्याबद्दल नाराज व्यक्त केली. यावर प्रणितने स्वतःची बाजू मांडत सांगितले की त्याने त्याचे काम केले आहे. प्रणीतने बसीर वर आरोप लावला की, तो छोट्या-छोट्या गोष्टींचा मुद्दा बनवतो.
दरम्यान, या भांडणामुळे प्रणित आणि बसीर यांच्यातील मैत्रीवर परिणाम होईल असं दिसत आहे. त्याचबरोबर आता बसीर-प्रणीत यांच्यातील या भांडणाला आणखी मोठं स्वरूप येणार का? आणि या दोघांच्या भांडणावर सलमान खान काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं प्रेक्षकांना उत्सुकतेचं ठरणार आहे.