Bigg Boss 19 fame Tanya Mittal Ex Boyfriend Arrested : ‘बिग बॉस १९’ फेम तान्या मित्तल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात ती अनेकदा तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसते. खऱ्या आयुष्यात तिच्याकडे किती पैसे आहेत, ती किती श्रीमंत आहेत याबद्दल सांगताना दिसते. त्याबद्दल काही दिवसांपूर्वीच तिच्या एक्स बॉयफ्रेंडनं प्रतिक्रिया दिलेली. परंतु, आता त्याला पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर आली आहे.

तान्या मित्तलनं ‘बिग बॉस’च्या घरात केलेल्या विधानांबद्दल तिचा एक्स बॉयफ्रेंड बलराज सिंहनं सगळं खोटं असल्याचं सांगत प्रतिक्रिया दिलेली. त्यावेळी त्यानं व्हिडीओ बनवत, त्याच्या व तानियाच्या नात्याबद्दलही सांगितलेलं. पण, अशातच आता माध्यामांच्या वृत्तानुसार त्याला अटक झाल्याचं म्हटलं जात आहे.

‘टेली मसाला’च्या वृत्तानुसार बलराज सिंहला पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. पण, त्याला अटक का झाली याबाबत अद्याप कोणतंही कारण समोर आलेलं नाही. ‘बिग बॉस’च्या घरात तान्या तिच्याबद्दल घरातली सदस्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असताना घराबाहेर तिचा एक्स बॉयफ्रेंड तिनं सांगितलेल्या गोष्टी खोट्या असून, ती दिखावा करीत असल्याचं त्यानं म्हणताना दिसला. तो तिच्याबद्दल नेहमी वेगवेगळी माहिती सांगताना दिसतो.

तान्या मित्तलबद्दल एक्स बॉयफ्रेंडने दिलेली प्रतिक्रिया

बलराज सिंह एक यूट्यूबर असून, त्यानं अलीकडेच ‘फिल्मी ग्यान’ला मुलाखत दिलेली. त्यामध्ये त्यानं तान्याला खोटं ठरवलेलं. तो म्हणाला, “ती अजिबात आध्यात्मिक नाहीये. मंदिरात जाऊन फोटो-व्हिडीओ काढते आणि बाहेर येऊन तिथल्या गुरुजींबद्दल वाईट बोलते. जर ती असंच करत राहिली, तर बिग बॉसच्या घरातला तिचा खेळ लवकरच संपेल.”

तान्या मित्तल व बलराज यांच्या नात्याबद्दल त्याची एक्स गर्लफ्रेंड जोया खाननं ‘टेली टॉक इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. तान्या व बलराजमध्ये कुठलंही रोमँटिक रिलेशन नसल्याचं तिनं सांगितलं. ती म्हणाली, “हे ऐकून मला हसू येतंय. कारण- मी गेल्या एक-दीड वर्षापासून त्याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. एक-दोन महिन्यांपूर्वीच आम्ही वेगळे झालो. तो कामावर जातोय सांगून तान्याला भेटायला जायचा”.