Bigg Boss 19 Contestants List, Premiere Episode Updates : बहुप्रतीक्षित बिग बॉसच्या १९ व्या पर्वाचा ग्रँड प्रिमियर सोहळा सलमान खानच्या उपस्थितीत पार पडला आहे. या शोचा प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांना ‘जिओहॉटस्टार’वर रात्री ९ वाजता पाहता येणार आहे. यानंतर ९० मिनिटांनी हे भाग ‘कलर्स वाहिनी’वर प्रक्षेपित केले जातील. हा सीझन एकूण १०५ दिवस सुरू राहणार आहे. यंदा शोमध्ये एकूण १६ सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. शोमधील स्पर्धकांची नावं जाणून घेऊयात…
‘बिग बॉस १९’ मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची नावं खालीलप्रमाणे आहेत….
- अशनूर कौर
- जीशान कादरी
- तानिया मित्तल
- अवेज दरबाज
- नगमा मिराजकर
- नेहल चुडासमा
- बसीर अली
- अभिषेक बजाज
- गौरव खन्ना
- नतालिया जानोस्झेक
- प्रणित मोरे
- फरहाना भट्ट
- नीलम गिरी
- कुनिका सदानंद
- मृदूल तिवारी
- अमाल मलिक
Bigg Boss Season 19 Updates
Bigg Boss 19 मध्ये प्रसिद्ध लोकप्रिय गायकाची एन्ट्री...
Bigg Boss 19 मध्ये लोकप्रिय गायक अमाल मलिकची एन्ट्री झालेली आहे. त्याने "ओह खुदा", "मैं रहूँ या ना रहूँ" अशी लोकप्रिय गाणी गायली आहेत.
Bigg Boss 19 च्या घरात एन्ट्री घेणारा १५ वा स्पर्धक आहे २४ वर्षीय मृदूल तिवारी. प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारे त्याची निवड करण्यात आली आहे.
Bigg Boss 19 - अभिनेत्री कुनिका सदानंद यांनी घरात एन्ट्री घेतली आहे...
अभिनेत्री, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या कुनिका सदानंद यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. एकेकाळी त्यांनी सलमान खानसह अनेक सिनेमांमध्ये काम केलेलं आहे.
Bigg Boss 19 - भोजपुरी नृत्यांगना पोहोचली बिग बॉसच्या घरात...
भोजपुरी नृत्यांगना नीलम गिरी ही बिग बॉसची १३ वी सदस्य आहे.
Bigg Boss 19 - घरात एन्ट्री घेणारी १२ वी स्पर्धक आहे...
मॉडेल आणि अभिनेत्री फरहाना भट्टने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. ती काश्मीरची रहिवासी असून, तिने 'लैला मजनू' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
https://twitter.com/HotstarReality/status/1959658601943068967
Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री घेणारा 'हा' मराठमोळा स्पर्धक आहे तरी कोण?
Bigg Boss 19 मध्ये लोकप्रिय मराठी स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरेने एन्ट्री घेतली आहे.
'वॉर २' आणि 'हाऊसफुल ५' मध्ये झळकणारी विदेशी अभिनेत्री आहे नतालिया जानोस्झेक.

Bigg Boss 19 मध्ये 'अनुपमा' फेम लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री
Bigg Boss 19 मध्ये 'अनुपमा' मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या गौरव खन्नाची एन्ट्री झालेली आहे.

Bigg Boss 19 मधील आठवा सदस्य...
Bigg Boss 19 - आठवा सदस्य आहे अभिषेक बजाज

Bigg Boss 19 मधील सातवे अन् आठवे सदस्य आहेत...
Bigg Boss 19 मध्ये सातव्या आणि आठव्या क्रमांकावर एन्ट्री घेणारे स्पर्धक आहेत बसीर अली आणि अभिषेक बजाज.

Bigg Boss 19 ची सहावी स्पर्धक आहे...
नेहल चुडासमाने Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री घेतलेली आहे. यापूर्वी तिने मिस युनिव्हर्स इंडियाचा खिताब जिंकलेला आहे.
Bigg Boss 19 मध्ये 'या' दोन लोकप्रिय इन्फ्लुएन्सरची एन्ट्री! अनेक वर्षांपासून आहेत अफेअरच्या चर्चा
Bigg Boss 19 मध्ये अवेज दरबाज आणि नगमा मिराजकर यांची एन्ट्री झालेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. अखेर, आमचं रिलेशनशिप सध्या ट्रायल मोडमध्ये असल्याची कबुली या दोघांनी बिग बॉसच्या मंचावर दिली आहे. अवेज हा गौहर खानची दीर आहे.
Bigg Boss 19 मध्ये जाणारी तिसरी स्पर्धक आहे तानिया मित्तल.
तानिया मित्तल आध्यात्मिक इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखली जाते. तिचे अनेक रील्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
Bigg Boss 19 - घरात एन्ट्री घेणारा दुसरा स्पर्धक आहे...
बिग बॉसच्या एन्ट्री घेणारा दुसरा स्पर्धक आहे 'गँग्ज ऑफ वासेपूर' फेम जीशान कादरी.
Bigg Boss 19 मधील पहिली स्पर्धक आहे तरी कोण? ५ वर्षांची असताना टेलिव्हिजनवर केलेलं पदार्पण
Bigg Boss 19 मध्ये सहभागी झालेल्या पहिल्या स्पर्धकाचं नाव आहे अशनूर कौर. तिने अवघ्या पाच वर्षांची असताना टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. तिला इंडस्ट्रीत काम करून १३ वर्षे झाली आहेत. अशनूरने 'झांसी की रानी', 'साथ निभाना साथिया', 'देवों के देव महादेव' या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
BIGG BOSS 19 - घरातील 'हे' निर्णय बदलले...
१. घरात होणारे वाद, भांडणं, टास्कबाबतचे सगळे निर्णय घरातील सदस्य घेतील.
२. किचनमध्ये 'बिग बॉस'चा हस्तक्षेप नसेल.
३. 'बेडरूम एरिआ'मध्ये होणाऱ्या गॉसिपमध्ये किंवा कोणत्याही समस्यांमध्ये 'बिग बॉस' मध्यस्थी करणार नाहीत.
BIGG BOSS 19 - यंदा एकच मंत्र 'लोकतंत्र'
यंदाच्या सीझनमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. घरातील बरेच निर्णय सदस्यांच्या हाती सोपवण्यात आले आहेत.
Bigg Boss 19 संभाव्य स्पर्धकांची यादी
स्क्रीनने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या १९ व्या पर्वात गौरव खन्ना, अशनूर कौर, अमाल मलिक, अवेज दरबार, नगमा मिराजकर, दिनो जेम्स, तान्या मित्तल, कुनिका सदानंद, झैशान क्वादरी, प्रणित मोरे आणि नतालिया स्टॅन्कोस्झेक हे स्पर्धक सहभागी होणार आहे. तसेच अपूर्वा मुखिजा, अरबाज पटेल, हंसिका मोटवानी, अली असगर आणि शैलेश लोढा यांचीही नावे सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये चर्चेत आहेत पण, यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.
Bigg Boss 19 - घराची पहिली झलक
Bigg Boss च्या १९ व्या पर्वाच्या घराची पहिली झलक आली समोर
Bigg Boss 19 Premiere : ‘बिग बॉस’चा नवीन सीझन प्रेक्षकांना कुठे पाहता येणार?
Bigg Boss 19 Premiere Updates : सलमान खान होस्ट करत असलेला 'बिग बॉस'चा १९ वा सीझन प्रेक्षकांना कुठे पाहता येणार?
Bigg Boss Season 19 Updates : दरवर्षीप्रमाणे ‘बिग बॉस’च्या १९ व्या पर्वाचा होस्ट बॉलीवूडचा भाईजान सलमान खान असेल. यंदा Bigg Boss ची थीम राजनीतीवर आधारित असेल. तसेच शोच्या नियमांमध्ये अनेक बदल देखील करण्यात आले आहेत.