Bigg Boss 19 Pranit More & Malti Chahar : ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं आणि या आकर्षणातून एकमेकांबद्दल प्रेमभावना निर्माण होणं काही नवीन नाही. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनमध्ये स्पर्धकांच्या जोड्या बनताना दिसतात. यापैकी काही जोड्या या ‘बिग बॉस’च्या शोपुरत्याच मर्यादित राहतात. तर ‘बिग बॉस’च्या घरातील काही जोड्या शोमधून बाहेर येताच एकत्र येतात. ‘बिग बॉस’च्या १९ व्या सीझनमध्येही बसीर आली आणि नेहल चुडासमा या जोडीची चर्चा झाली.

अशातच आता ‘बिग बॉस १९’मध्ये आणखी एक जोडी तयार होतेय की काय असा प्रश्न नुकत्याच आलेल्या एका प्रोमोमधून प्रेक्षकांना पडला आहे. ‘बिग बॉस’चा शो सुरू होऊन आता जवळपास ३ महीने व्हायला आले आहेत. सहोमध्ये रोज अनेक ट्विस्ट येत आहेत. ‘बिग बॉस’चा हा खेळ आणखी रंजक होण्यासाठी मेकर्स नवनवे टास्क स्पर्धकांसाठी आणत आहेत. अशातच आता ‘बिग बॉस’च्या घरात एक नवीन जोडी तयार होणार आहे.

समोर आलेल्या ‘बिग बॉस १९’च्या नव्या प्रोमोमध्ये गौरव आणि प्रणीत गार्डन एरियात चालत असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये मालती येते. तेव्हा गौरव तिला ‘तू मध्ये मध्ये का येतेयस?’ असं विचारतो. त्यानंतर मालती ‘मी येणार’ असं उत्तर देते. पुढे सगळे जण हसतात. त्यानंतर प्रणीत मालतीला त्याचं जॅकेट घालण्यासाठी देतो. नंतर मालती प्रणीतला बाहेर एकत्र बसण्यासाठी बोलावते. त्यावर फरहाना प्रणीतला चिडवत ‘नवीन हॅशटॅग’ असं म्हणते. त्यावर प्रणीतही तिला ‘तुम्ही तुमचं स्वत:चं नीट बघा. माझ्या आणि तिच्याबद्दल कशाला चर्चा करताय?’ असं म्हणतो. यावर फरहाना, तान्या आणि नीलम त्याची मस्करी करतात. पुढे

पुढेनंतर मृदुलही प्रणीतची मस्करी करत ‘आता याचीही मालतीबरोबरची मैत्री वाढू लागलीय’ असं म्हणतो. त्यानंतर गौरवही त्याला मालतीवरून चिडवतो. नंतर व्हिडीओमध्ये पुढे गार्डन एरियात मालती आणि प्रणीत एकत्र बसल्याचे दिसत आहे. प्रणीतने दोघांसाठी ऑमलेट बनवल्याबद्दल मालती त्याचं कौतुक करते. या प्रोमोवरून प्रणीत आणि मालती यांच्यातल्या प्रेमाच्या नव्या ट्विस्टची चर्चा सुरू झाली आहे. प्रेक्षकांनी तशा प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केल्या आहेत.

बिग बॉस १९ चा नवा प्रोमो चर्चेत

या व्हिडीओखालील कमेंट्समध्ये ‘दोघांची एकत्र जोडी छान दिसेल’, ‘प्रणीतबरोबर मालती खूप छान दिसत आहे’, ‘दोघांची जोडी आवडलीय’, ‘एक नंबर जोडी’ या आणि अशा अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त करत प्रणीत-मालती जोडीबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. आता या दोघांमध्ये मैत्री पेक्षा काही आहे का? दोघांचं हे नातं मैत्रीपुढे जाईल का? हे येत्या आगामी भागांत प्रेक्षकांना पाहता येणार आहे.