Bigg Boss 19 Promo: ‘बिग बॉस’ हा असा रिअॅलिटी शो आहे, ज्यामध्ये रोज काहीतरी नवीन घडताना दिसते. स्पर्धकांची समीकरणे दररोज बदलताना दिसतात. मित्र असतात, ते शत्रू होतात, शत्रू असलेले लोक मदतीचा हात पुढे करतात, अनेकदा स्पर्धक टास्क पूर्ण करताना घरातील साहित्याची तोडफोड करतात. अपशब्द वापरतात, भांडण काढतात, तसेच बिग बॉसचे नियम मोडताना देखील दिसतात.
या सगळ्यात बिग बॉसच्या घरात विविध परिस्थितीत स्वत:ला, तसेच परिस्थितीला सामोरी जाणारी शांतपणे विचार करणारी तर कधी योग्य निर्णय घेत गोष्टी सांभाळणाऱ्या व्यक्ती लोकांना आवडतात. बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोठी लोकप्रियता मिळते.
सदस्यांची एकमेकांशी समीकरणे बदलतात. तसेच, नियमांचे पालन केले नाही तर बिग बॉस अनेकदा शिक्षा देतात. आता यावर्षीच्या सीझनमध्ये अमाल मलिक, गौरव खन्ना, तान्या मित्तल, प्रणित मोरे, फराहाना, नेहल चुडासमा, बसीर, असे स्पर्धक सहभागी झाले आहेत. बाहेरच्या जगात त्यांच्या कामामुळे हे स्पर्धक लोकप्रिय आहेत.
…अन् बिग बॉस संतापले
आता कलर्स टीव्हीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की बिग बॉसने स्पर्धकांना एक टास्क दिला होता. मात्र, स्पर्धक तो टास्क गंभीरतेने करत नाहीत. त्यामुळे बिग बॉसचा संताप होतो. ते त्यांना कडक शब्दात सुनावतात.
प्रोमोमध्ये दिसते की नीलम तिच्या कपड्यांमध्ये काहीतरी लपवते. बिग बॉस ते पाहून म्हणतात की नीलम तुझ्याजवळ काय आहे? त्यानंतर घरातील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसते. गौरव व प्रणीत म्हणतात की लोक असे का करतात? त्यानंतर बिग बॉस म्हणतात की शहबाज तुम्ही काय करत आहात?
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की गौरव बिग बॉसला सॉरी असे म्हणतो. त्यावर बिग बॉस संतापाने म्हणतात की गौरव कोणत्याही प्रकारचा उपकार करायची गरज नाही. पुढे ते म्हणतात की तुमच्या भावनांचा विचार करून हा टास्क आयोजित केला होता. याचा अर्थ तुमच्यावर कोणती जबाबदारी देऊ शकत नाही? की या गोष्टी तुम्ही मुद्दाम केल्या आहेत. जर तुम्हाला या गोष्टींची किंमतच नसेल तर…त्यानंतर बिग बॉसमधील सदस्य माफी मागत असल्याचे दिसत आहेत. शेवटी तान्या रडताना दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना कलर्स वाहिनीने बिग बॉसची नाराजी पाहून सगळ्यांनी त्यांनी माफी मागितली अशी कॅप्शन दिली आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. “नीलम व शहबाजला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट करा”, “गौरव खन्नाने योग्य गोष्ट आहे”, “काय झालं”, “जर बिग बॉस सर्वांना शिक्षा द्या, तेव्हाच मजा येईल”, अशा काही कमेंट्स पाहायला मिळत आहे. तर अनेकांनी फरहानाच्या वागण्याबद्दलदेखील वक्तव्य केले आहे.
दरम्यान, आता बिग बॉसच्या घरात नेमके काय घडणार? स्पर्धकांच्या कोणत्या चुकीमुळे बिग बॉसचा संताप होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.