Bigg Boss 19 Awez Darbar Exit : टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’चा सहावा आठवडा सुरू झाला आहे. आतापर्यंत या शोमधून तीन स्पर्धक बाहेर गेले आहेत. पहिले दोन आठवडे एकाची स्पर्धकाचं एलिमिनेशन झालं नव्हतं. तिसऱ्या आठवड्यात घरातून दोन स्पर्धक एलिमिनेट झाले. नतालिया आणि नगमा शोमधून बाहेर गेल्या. तर, चौथ्या आठवड्यात नेहल एलिमिनेट झाली; पण ‘बिग बॉस’ने तिला सीक्रेट रूममध्ये पाठवले.
पाचव्या आठवड्यात कोरिओग्राफर व इन्फ्लुएन्सर आवेज दरबार शोमधून बाहेर पडला. शनिवारच्या ‘वीकेंड का वार’ भागात अभिनेत्री गौहर खानने त्याला त्याचा खेळ सुधारण्यासाठी सूचना दिली होती. गौहरने, “या घरात तुझा खेळ तुलाच खेळायचा आहे. तू चांगला खेळला नाहीस, तर तुला कोणी वोट देणार नाही आणि तू शोच्या बाहेर पडशील”, असं म्हटलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी आवेज शोमधून एलिमिनेट झाले.
आवेज दरबारच्या एलिमेनेशनवर चाहते नाराज
आवेज दरबारच्या अचानक बाहेर जाण्यामुळे त्याच्या चाहत्यांसह अनेक प्रेक्षक नाराज झाले. आवेजच्या एलिमिनेशननंतर सलमान खाननं सांगितलं की, आवेजला कमी मतं मिळाल्यामुळे शोमधून बाहेर जावं लागले. पण काही वृत्तांनुसार, कमी वोट्स नव्हे, तर आवेजच्या कुटुंबानंच त्याला शोमधून बाहेर काढलं असल्याचा दावा केला जात आहे.
आवेजच्या एलिमेनेशनला एक्स गर्लफ्रेंड आहे कारण?
काही वृत्तांनुसार, शोमधील वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी आवेज दरबारची एक्स गर्लफ्रेंड शुभी जोशीचं नाव पुढे आलं होतं. या गोष्टीमुळे घरात आधीच वाद सुरू झाले होते. अमाल आणि बसीर यांनी आवेजच्या वैयक्तिक आयुष्यातील नात्याबद्दल टीका केली होती, ज्यामुळे तो खूप दु:खी झाला होता. तसेच त्याला रडूदेखील कोसळलं होतं.
अशा परिस्थितीत आवेजच्या कुटुंबाने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा सार्वजनिक होऊ नये म्हणून शोमधून बाहेर घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यासाठी कुटुंबीयांनी निर्मात्यांना पैसे देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
शुभी जोशीने याआधी एका मुलाखतीत कबूल केले होते की, तिचं आणि आवेजचं एकेकाळी रिलेशन होतं. त्यानंतर चर्चा सुरू झाली की, आवेजनं नगमाबरोबर रिलेशनमध्ये असताना शुभीला धोका दिला होता. नंतर हेही समोर आलं की, शुभी ‘बिग बॉस १९’मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊ शकते.
हे लक्षात घेता, आवेजचं कुटुंबीयांनी त्याचं वैयक्तिक नातं टेलिव्हिजनवर येऊ नये म्हणून त्याला शोमधून बाहेर काढण्याच्या निर्णय घेतला. अर्थात, या सर्व गोष्टींवर अद्याप ‘बिग बॉस’च्या मेकर्सकडून किंवा आवेज आणि त्यांच्या कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.