बिग बॉस १६ मध्य सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला अब्दू रोझिक आपल्या प्रोफेशनल कारणामुळे नुकताच घरातून बाहेर पडला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अब्दू त्याच्या चाहत्यांना भेटत आहे. बिग बॉसच्या घरात असताना अब्दूने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. पण घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला भारतीय चाहत्यांचं खूप प्रेम मिळत आहे. बिग बॉसच्या घरात असताना अब्दू आणि साजिद खान यांची चांगलीच गट्टी जमली होती. पण आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अब्दूने साजिद खानने घरात असताना ‘टट्टी’वरून केलेल्या त्या मस्करीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अब्दूने निमृत कौर अहलूवालियाबरोबरचं बॉन्डिंगपासून ते बिग बॉसच्या घरात दुसऱ्यांदा एंट्री केल्यानंतर अंकित गुप्ताला शोधण्यापर्यंत सर्वच गोष्टींवर गप्पा मारल्या. जेव्हा अब्दूने बिग बॉसच्या घरात दुसऱ्यांदा एंट्री केली होती तेव्हा अंकित गुप्ता बिग बॉसमधून बाहेर पडल्याचं त्याला माहीत नव्हतं असं त्याने सांगितलं. याशिवाय या मुलाखतीत अब्दूने साजिद खानने त्याच्या पाठीवर ‘टट्टी’ असं लिहिल्याच्या मस्करीबद्दलही पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

आणखी वाचा- Video : वीणा जगतापला डेट केल्यानंतर ‘बिग बॉस १६’मध्ये शिव ठाकरेला मिळाली नवी गर्लफ्रेंड?

‘कोईमोई’शी बोलताना अब्दू रोझिकने निमृतच्या वाढदिवशीच्या एपिसोडबद्दल बोलताना साजिद खानने त्याच्या पाठीवर ‘आय लव्ह टट्टी’ लिहून केलेल्या घाणेरड्या मस्करीचा उल्लेख केला. अब्दू म्हणाला, “अनेकदा खऱ्या आयुष्यात या गोष्टी चांगल्या वाटत नाहीत. सर्व प्रेक्षक, पूर्ण जग, माझे आई-वडील हो शो पाहत होते. साजिदभाईने मला सांगितलं होतं की तो आय लव्ह यू निमृत असं लिहिणार आहे. मी तर त्याला हॅप्पी बर्थ डे असं काहीतरी लिहायला सांगितलं होतं. त्याने काय लिहिलं हे त्याने सांगितलं नाही आणि मला माझ्या पाठीवर काय लिहिलंय हे वाचता येणं शक्य नव्हतं. जेव्हा त्या शब्दाचा अर्थ समजल्यानंतर मला खूप दुःख झालं. जर तुमचा चांगला मित्र तुमच्या पाठीवर असं काहीतरी लिहितो आणि ते संपूर्ण जग पाहत असेल तर हे चांगलं दिसत नाही.”

आणखी वाचा- Video : ‘बिग बॉस १६’मधून अब्दू रोजिकची एक्झिट, घरातून बाहेर पडताना ढसाढसा रडला, व्हिडीओ पाहून प्रेक्षक संतापले

दरम्यान अब्दू रोझिकचं नवीन गाणं ‘प्यार’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्याच्या प्रमोशनमध्ये तो खूप व्यग्र आहे. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी तो त्याच्या गाण्याचे जोरदार प्रमोशन करत आहे आणि तिथले लोकही त्याला भरपूर पाठिंबा देताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss fame abdu rozik first reaction on sajid khan wrote tatti on his back mrj
First published on: 16-01-2023 at 17:15 IST