इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) च्या प्रदर्शनीय सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानावर क्रिकेट खेळताना दिसला. यादरम्यान मास्टर ब्लास्टर त्याच्या आधीच्या काळात ज्या शैलीत फलंदाजी करत होता त्याच शैलीत या सामन्यातही फलंदाजी करताना दिसला. मात्र, त्याची खेळी फार काळ टिकली नाही कारण त्याला बिग बॉसचा १७ चा विजेता मुनव्वर फारुकी याने बाद केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राचा उद्घाटन सोहळा ६ मार्च रोजी मुंबईत पार पडला. यामध्ये अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटीजनी सहभाग घेतला होता. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सचिन तेंडुलकरच्या ‘मास्टर – ११’चा सामना अक्षय कुमारच्या ‘खिलाडी-११’शी झाला.

आणखी वाचा : वीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा का? अभिनेता रणदीप हुड्डाने दिलं चोख उत्तर; म्हणाला…

या सामन्यात ‘मास्टर-११’ संघाने नाणेफेक जिंकून ७ गडी गमावून ९४ धावा केल्या. या सामन्यात सचिनने शानदार फलंदाजी केली. अक्षय कुमारच्या चेंडूवर त्याने शानदार षटकारही मारला. मात्र, मुनव्वर फारुकीने टाकलेल्या पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सचिनने एक वेगळाच शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, जो जवळच्या खेळाडूने सहज झेल घेतला. आऊट होण्यापूर्वी सचिनने १७ चेंडूत ३० धावा केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर सचिनची विकेट घेतल्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सचिनचा झेल घेतल्यानंतर स्टेडियममध्ये एकप्रकारची शांतता अनुभवायला मिळाली असल्याचं कॉमेंटेटरने नमूद केलं. काहींनी या व्हिडीओखाली कॉमेंट करत मुनव्वरला ट्रोल केलं तर काहींनी हा सचिनच्या आयुष्यातील सर्वात पडता काळ असं म्हणत कॉमेंट केलं. एकाने लिहिलं, “कृपया मला सांगा की हा व्हिडीओ एआय च्या सहाय्याने बनवला गेला आहे, कारण माझा यावर विश्वासच बसत नाहीये.” तर एकाने लिहिलं, “२०२४ मध्ये आणखी काय पाहायचं बाकी आहे?”