अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ४ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांची चांगलीच मन जिंकली आहेत. तेजश्रीने साकारलेली मुक्ता आणि राजने साकारलेला सागर तसेच इतर पात्र अल्पावधीतच घराघरात पोहोचले आहेत. लवकरच गोखले-कोळी कुटुंबात शुभकार्यास सुरुवात होणार आहे. मुक्ता-सागर लग्नबंधनात अडकणार असून दोन्ही कुटुंबात लग्नाची लगबग सुरू झाली आहे. मुक्ता-सागरच्या लग्नासाठी काही खास पाहुणे येणार आहेत.

मुक्ता-सागरचं लग्न गोखले कुटुंबियाच्या रितीरिवाजानुसार होणार आहे. साखरपुडा, मेहंदी, हळद, सप्तपदी असं समारंभपूर्वक लग्न पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – Premachi Goshta: कोळी पेहरावात पाहून राज हंचनाळेच्या बायकोची होती ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाली, “घरी…”

नुकताच सागर म्हणजे राज हंचनाळेच्या इन्स्टाग्राम पेजवर हळदीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये हळदीच्या तयारीपासून ते डान्स वगैरे सर्व काही पाहायला मिळत आहे. हळदीच्या समारंभासाठी सागर खास कोळी पेहरावात दिसत आहे. तर मुक्ता पांढऱ्या रंगाच्या साडीत पाहायला मिळत आहे. यादरम्यान गोखले-कोळी कुटुंबातील सदस्य एका प्रसिद्ध गायकाच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हा प्रसिद्ध गायक म्हणजे लाडका दादूस. मुक्ता-सागरच्या लग्नासाठी खास ‘बिग बॉस मराठी’ फेम संतोष चौधरी यांनी हजेरी लावली आहे. तसेच माहितीनुसार, अभिनेत्री किशोरी अंबिये देखील पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – शुभांगी गोखलेंनी दोन्ही हातावर स्वतः काढली मेहंदी, हे पाहून तेजश्री प्रधान कौतुक करत म्हणाली, “ती स्वयंभू…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनेक व्हिडीओमध्ये मुक्ता-सागरचा साखरपुडा किंवा इतर समारंभ निर्विघ्नपणे पार पडताना दिसत असले तरी यामध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हे ट्विस्ट नक्की कोण आणणार? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.