Bigg Boss 16 Grand Finale 2023: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज रविवारी (१२ फेब्रुवारी) पार पडला. यंदा बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. अखेर रविवारी रात्री उशिरा बिग बॉस हिंदीच्या विजेत्याची घोषणा झाली. पुण्याचा रॅपर अशी ओळख असलेला एमसी स्टॅन हा बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाचा विजेता ठरला.

रविवारी (१२ फेब्रुवारी) संध्याकाळी ७ वाजल्यापासून ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. यंदा ‘बिग बॉस’च्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी या स्पर्धकांनी टॉप ५ स्पर्धकांबरोबर विविध खेळ खेळले. त्यांच्यात विविध गंमतीजमतीही पाहायला मिळाल्या.
आणखी वाचा : MS Stan Wins Bigg Boss 16: पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन ठरला ‘बिग बॉस १६’ चा विजेता; शिव ठाकरे उपविजेता

दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन केले. यंदा ‘बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले. या पाच जणांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.

यावेळी सर्वप्रथम एका टास्कदरम्यान शालीन भानोत हा घराबाहेर पडला. यानंतर अर्चना गौतम हिचा बिग बॉसचा प्रवास संपला. यामुळे शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी हे तीन जण बिग बॉसचे टॉप ३ स्पर्धक ठरले. यानंतर सलमान खानने टॉप २ सदस्य म्हणून शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन या दोघांच्या नावाची घोषणा केली. तर प्रियांकाचा या घरातला प्रवास संपल्याचे सांगितले. यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

यानंतर सलमानने शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनला मंचावर येण्यास सांगितले. त्यानंतर त्याने पुण्याचा रॅपर असलेल्या एमसी स्टॅनचा हात उंचावत ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाचा विजेत्याची घोषणा केली. त्यामुळे शिव ठाकरेला दुसऱ्या क्रमांकावर स्थान मानावे लागले. एमसी स्टॅनला ‘बिग बॉस’ची चमकती ट्रॉफी मिळाली. त्याबरोबर त्याला ३१ लाख ८० हजार ही रक्कमही मिळाली.

आणखी वाचा : “कॉलेजपासून…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने स्नेहलबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान यानंतर सर्व स्पर्धकांनी तसेच चाहत्यांनी एमसी स्टॅनचे तोंडभरुन कौतुक केले. बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर एमसी स्टॅनच्या नावाचा ट्रेंडही सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. तसेच त्याचे अनेक चाहते सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.