‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर पडले. रविवारी प्रसाद जवादेने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. तर बुधवारी पार पडलेल्या नॉमिनेशनमध्ये आरोह वेलणकरचा घरातील प्रवास संपुष्टात आला.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर आरोहने ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक खुलासे केले आहेत. आरोहने यंदाच्या पर्वातील नॉमिनेशनवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. तो म्हणाला, “बिग बॉसच्या चौथ्या पर्वात अनेक ट्वीस्ट होते. प्रसाद जवादे व अमृता देशमुख चांगले स्पर्धक होते. त्यांच्या घरातून बाहेर जाण्याने मलाही धक्का बसला होता. मी त्यांना टॉप ५ फायनलिस्टमध्ये बघत होतो. वाईट व नकारात्मक वृत्तीचे स्पर्धक घरात आहेत आणि सकारात्मक स्पर्धकांना बाहरे काढलं गेलं आहे”.

हेही वाचा>>“मी बाहेर आलोय पण…”, ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेतल्यानंतर आरोह वेलणकरची पोस्ट

हेही वाचा>>“…शेवटी मीच जिंकावं”, ‘बिग बॉस मराठी’ची फर्स्ट फायनलिस्ट अपूर्वा नेमळेकरची पोस्ट चर्चेत

“घरातील सदस्यांपैकी मी एक उत्कृष्ट स्पर्धक होतो. मी खेळातून बाहेर पडेन, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पात्रता नसलेले सदस्य अजूनही घरात व टॉप ५ मध्ये आहेत. मला यावर आता जास्त बोलायचं नाही. कारण, मी घरातून बाहेर पडलो आहे. पण मी माझा खेळ उत्तमरित्या खेळलो”, असंही पुढे आरोह म्हणला.

हेही वाचा>>उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं; भगवा ड्रेस परिधान करत ‘बेशरम रंग’ गाण्यावर व्हिडीओ बनवला अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोह वेलणकरने एक्झिट घेतल्यानंतर आता अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, किरण माने, अक्षय केळकर व अमृता धोंगडे यंदाच्या पर्वाचे टॉप ५ फायनलिस्ट ठरले आहेत. रविवारी, ८ जानेवारीला होणाऱ्या अंतिम सोहळ्यात ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता घोषित केला जाणार आहे.