Bigg Boss Marathi 4 Grand Finale : ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा रंजक प्रवास आता लवकरच संपणार आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्याला सुरवात झाली आहे. यंदा ‘बिग बॉस’ मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या कार्यक्रमातून एक मोठी बातमी समोर आली ती म्हणजे राखी सावंतबद्दल, ती या घरातून बाहेर पडली आहे.

‘बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्याच्या सुरवातीलाच तिने आपल्या डान्समधून प्रेक्षकांना घायाळ केले होते, तिच्या डान्सनंतर बझर राऊंड या टास्कला सुरवात झाली. ज्यात स्पर्धकांपुढे एक पर्याय ठेवण्यात आला तो पर्याय असा होता की विजेत्या स्पर्धकाला मोठी रक्कम मिळणार मात्र इतर स्पर्धकांना बक्षीस मिळणार नाही म्हणून हा बझर राउंड ठेवण्यात आला, ज्यात स्पर्धक ९ लाख रुपये घेऊन घराच्या बाहेर पडू शकतात, सुरवातीला ५ लाख इतकी रक्कम होती नंतर ती वाढवण्यात आली आणि अखेर राखी सावंतने हा पर्याय निवडला आणि ती घराच्या बाहेर पडली आहे. घरातून जाताना तिने आईचे आभार मानले तसेच ती म्हणाली “मला याचा पश्चाताप नाही.”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Bigg Boss Marathi Season 4 : मुंबईच्या रस्त्यांवर ‘शेवंता’साठी बॅनरबाजी; चाहते म्हणाले जिंकणार तर अपूर्वाच

यंदाच्या पर्वात अनेक ट्वीस्ट पाहायला मिळाले, या पर्वात चार स्पर्धकाची वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती. ज्यात राखी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर व मीरा जग्गनाथ हे सदस्य होते. राखीने घरात प्रवेश करताच दमदार डायलॉग बाजी सुरू केली होती