‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व अधिक रोमांचक होत चाललं आहे. राखी सावंतने घरात एन्ट्री घेतल्यापासून ती काहीतरी करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. एंटरटेनमेंटचं फूल टू पॅकेज असलेली राखी प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसत आहे.

राखी याआधी ‘बिग बॉस हिंदी’च्या १५व्या पर्वातही सहभागी झाली होती. या पर्वात अभिजीत बिचुकलेही होता. राखीने ‘बिग बॉस’च्या घरात बिचकुलेबरोबरच्या आठवणी सांगितल्या. ती म्हणाली, “अभिजीत बिचुकले फार लोकप्रिय होता. पण तो हा शो जिंकू शकला नसता. ‘बिग बॉस’च्या घरात तो दिवसभर झोपून असायचा. कोणत्याही टास्क किंवा खेळात तो सहभाग घ्यायचा नाही”.

हेही वाचा>> “ज्याला लावणी माहीत नाही त्याला…” मेघा घाडगेची संतप्त पोस्ट

“अभिजीत बिचुकलेला घरातील वॉशरुम वापरायचं असायचं, तेव्हा तो घरातील सगळ्या सदस्यांना वॉशरुममधून बाहेर काढायचा. तो दिवसभर दातही घासायचा नाही. माझ्या तोंडातून बासुंदीचा सुगंध येतो, असं तो सांगायचा”, असंही राखीने सांगितलं.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतला लागली लॉटरी; प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिली चित्रपटाची ऑफर

पुढे ती म्हणाली, “आमच्याबरोबर देवोलीना भट्टाचार्जीही होती. ती बिग बॉसच्या घरात अभिजीतचं सगळं काम करायची. त्याच्यासाठी ती जेवणही बनवायची. पण, बिचुकलेने सर्वात आधी तिलाच नॉमिनेट केलं होतं. मी तुमची बेस्ट फ्रेंड आहे, तुमचे कपडे मी धुतले आहेत. तुम्ही मलाच का नॉमिनेट करताय, असं देवोलिना बिचुकलेला म्हणाली. यावर बिचुकले तिला मग काय झालं, मी तुलाच नॉमिनेट करणार. तू घराच्या बाहेर जा”.

हेही पाहा>>Photos: ‘पठाण’मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला शाहरुख खान इन्स्टाग्रामवर फक्त ‘या’ सहा जणांना करतो फॉलो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचे आता काहीच आठवडे शिल्लक आहेत. खेळात टिकून राहण्यासाठी स्पर्धकांना नवे डावपेच आखावे लागणार आहेत. त्यामुळे आता खेळ अधिक रंजक होणार आहे.