छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ मराठीमधून रविवारी स्पर्धक समृद्धी जाधव बाहेर पडली. ती या घरातली पहिली कॅप्टनही होती. ती मागच्या आठवड्यात नॉमिनेटे झाली होती, तिला कमी मतं मिळाल्याने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं. ५० दिवसांनी समृद्धीचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. तिने घराबाहेर पडल्यावर तिच्या आणि अपूर्वाच्या मैत्रीबद्दल भाष्य केलंय.

काही दिवसांपूर्वी तिचं अपूर्वाशी भांडण झालं होतं. त्याबद्दल समृद्धी ‘राजश्री मराठी’शी बोलताना म्हणाली, “नातं मैत्रीचं असो अथवा पती पत्नीचं ते एकतर्फी नाही, तर दोन्ही बाजूंनी असावं लागतं. एकतर्फी नात्यात ताकद असते किंवा ते सुंदर असतं असं आपण म्हणतो, पण ते टिकत नाही. हीच गोष्ट माझ्याबरोबर झाली. जेव्हा अपूर्वाला गरज होती, तेव्हा मी तिथे तिच्यासाठी होते, पण तिची आणि अक्षयची मैत्री झाल्यावर तिला माझी गरज कमी भासू लागली. त्यानंतर तिने मला याचं काय वाटतंय, याचा विचार केला नाही. मी पहिल्यांदा नॉमिनेट झाल्यावरही तिने मला ‘तू ठिक आहेस का’, असं विचारलं नाही. मग मी प्रतिक्रिया देणं टाळलं. पण दोन-तीन वेळा असं घडल्याने मी बोलायला हवं, असं मला वाटू लागलं. मग मी बोलण्याचा प्रयत्न केला. पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी मी तिच्यापासून दूर झाले.”

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून समृद्धी जाधव बाहेर; ठरली होती पहिली कॅप्टन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपूर्वा यशश्री आणि तुझी मैत्री खटकत होती का, असं विचारलं असता समृद्धी म्हणाली, “होय. शंभर टक्के. कारण कोणत्याही दोन व्यक्तींच्या मैत्रीत तिसरी व्यक्ती येत असेल, तर ती तिसऱ्याची नाही तर त्या दोघांची चूक असते. कारण त्यांची मैत्री कमजोर असेल तरंच तिसऱ्याच्या येण्याने ती तुटणार, असं मला वाटतं. माझी व अपूर्वाची मैत्री तेवढी चांगली असती तर यशश्रीच्या असण्याने अपूर्वा लांब गेलीच नसती. त्यामुळे मी २३ वर्षांची असून हे समजू शकते, तर ती खूप अनुभवी आहे. त्यामुळे मैत्री तुटताना तिने दिलेली कारणं पटली नाहीत,” असं समृद्धीने सांगितलं.