छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’. यंदा ‘बिग बॉस मराठी’ची रंगत दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरु असलेल्या बिग बॉसमध्ये अनेक राडे, भांडण, स्पर्धकांमध्ये सतत होणारे वाद पाहायला मिळत असतात. ५० दिवस उलटल्यानंतर आता खेळ अधिक रंजक होत चालला आहे.

‘बिग बॉस’च्या घरातून या आठवड्यात समृद्धी जाधव बाहेर पडली आहे. समृद्धीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास या आठवड्यात संपला. यंदाच्या पर्वातील बिग बॉसच्या घरातील पहिली कॅप्टन समृद्धी बनली होती. परंतु, आता खेळातून ती बाहेर पडली आहे.

हेही वाचा>> मानसी नाईकचे पती प्रदीप खरेरावर गंभीर आरोप, म्हणाली “पैसे व प्रसिद्धी मिळवण्यासाठी…”

हेही वाचा>> “मन भरलं म्हणून…” घटस्फोटाच्या चर्चांवरुन ट्रोल करणाऱ्यांना मानसी नाईकचे सडेतोड उत्तर

बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी सदस्यांची शाळा घेतलेली पाहायला मिळाली. अमृता धोंगडे, अक्षय केळकरची कानउघडणी केली. तर अपुर्वा नेमळेकर, अमृता देशमुख व तेजस्विनी लोणारीच्या खेळाचं कौतुक केलं.

हेही वाचा>> विक्रम गोखले यांच्या निधनाने बिग बी भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाले “भूमिका निभावली आणि हा मंच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस’च्या घरात येणाऱ्या आठवड्यात आणखी चार नवीन सदस्यांची एन्ट्री होणार आहे. याआधी स्नेहलता वसईकरने वाइल्ड कार्डद्वारे ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला होता. आता चार सदस्यांनी एन्ट्री केल्यानंतर घरातील समीकरणं किती बदलणार हे पाहणं रोमांचक ठरणार आहे.