‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलं. या पर्वाचं विजेतेपद कोण पटकवणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. अक्षय केळकर हा ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. विजेतेपद घोषित झाल्यानंतर अक्षयचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर सोशल मीडियाद्वारेही अक्षयवर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

आणखी वाचा – Pathaan Trailer : देशभक्ती, जबरदस्त अ‍ॅक्शन अन्…; शाहरुख व दीपिकाच्या बहुचर्चित ‘पठाण’चा ट्रेलर पाहिलात का?

अक्षय व अपूर्वा नेमळेकर या दोघांमध्ये विजेता कोण करणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. पण अक्षयने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तर अपूर्वा या पर्वाची उपविजेती ठरली. या सुंदर क्षणी आपले मित्र मंडळी व कुटुंबिय आपल्या बरोबर मंचावर नसल्याची अक्षयला खंत आहे.

अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पुन्हा एकदा ‘बिग बॉस’चा महाअंतिम सोहळा पाहताना दिसत आहे. तसेच त्याने त्याच्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत. पण यावेळी त्याने घरी कुटुंबीयांबरोबर हा क्षण पुन्हा एकदा अनुभवला.

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षय म्हणाला, “ट्रॉफी घेताना खूप भारीच वाटलेलं. पण तेव्हा मित्र, कुटुंबिय तिथे माझ्याबरोबर नव्हते. त्यांच्याबरोबर बसून पुन्हा तो क्षण जगताना जे सापडलं त्यालाच सुख म्हणतात.” ‘बिग बॉस’ची ट्रॉफी स्वीकारताना कुटुंबिय आपल्याबरोबर असावेत असं अक्षयला वाटत होतं. पण त्याने स्वतःच्या घरात येऊन हा क्षण कुटुंबीयांबरोबर पुन्हा एकदा अनुभवला.