Bigg Boss Marathi 5 वे पर्व सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. बिग बॉसने दिलेल्या टास्कमुळे स्पर्धकांमध्ये झालेल्या वादाने, तर कधी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने स्पर्धकांची शाळा घेतल्यामुळे हा शो सतत चर्चेत असतो. आता आर्याने निक्कीला कानाखाली मारल्याने मोठी चर्चा सुरू होती. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने आर्याला तिच्या कृत्यासाठी जाब विचारला असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

काय म्हणाला रितेश देशमुख?

समोर आलेल्या प्रोमोमध्ये सुरुवातीला रितेश देशमुखने आर्याला जेलमधून बाहेर यायला सांगितले. त्यानंतर तिला जाब विचारताना म्हटले, “तुम्ही स्वत:ला काय समजता? तुम्हाला राग आला तर तुम्ही कोणावरही हात उचलणार? आर्या तुम्ही जे केलं ते शंभर टक्के हेतुपूर्वक केलं होतं; तर मी बिग बॉसला विनंती करतो की त्यांनी आपला निर्णय सांगावा.” ज्यावेळी रितेश देशमुख आर्याला हे विचारत होता, त्यावेळी ती मान खाली घालून बसलेली दिसत आहे.

कलर्स मराठी

बिग बॉसने स्पर्धकांना कॅप्टन्सी पदाचा टास्क दिला होता. जादुई हिरा मिळवण्याचा हा टास्क होता. हा हिरा मिळवण्यासाठी जान्हवी, वर्षा उसगांवकर, आर्या, निक्की आणि अंकिता यांच्यामध्ये चढाओढ लागली. यादरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये भांडणास सुरुवात झाली. यावेळी आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. त्यानंतर निक्की रडत तिथून बाहेर गेली. तिने बिग बॉसला म्हटले की, आर्याने मला मारलं, मी हे सहन करून घेणार नाही. एकतर तिला बाहेर काढा किंवा मला बाहेर काढा. आर्याने म्हटले की मला काही घेणं-देणं नाही.

हेही वाचा: “…ते तुला नक्की एक संधी देतील”, निक्कीला मारणाऱ्या आर्याला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याने दिला ‘हा’ सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेनंतर बिग बॉसने, आर्याचे हे कृत्य निंदनीय आहे. हे कृत्य करून तिने बिग बॉसच्या मूलभूत नियमांचे उल्लंघन केले आहे; तिला जेलमध्ये टाकण्यात यावे आणि याचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर होणार असल्याचे म्हटले होते. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखने आर्याला कडक शब्दात सुनावले आहे. आता तिच्याबाबतीत काय निर्णय घेतला जाणार, हे आजच्या भाऊच्या धक्क्यावर पाहायला मिळणार आहे. तिला नेमकी काय शिक्षा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.