Suraj Chavan Village Celebration Video: रीलस्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठी ५ चा विजेता ठरला आहे. सूरजने हा शो जिंकल्यानंतर त्याच्या गावात जल्लोषाचं वातावरण आहे. बारामतीजवळच्या मोढवे गावातील सूरज टीव्हीवरील लोकप्रिय शोचा विजेता ठरला आणि त्याच्या गावात गुलालाची उधळण झाली.

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठी ५ चा विजेता ठरल्यावर सूरज चव्हाणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या मोढवे गावातील आहे. सूरजने हा शो जिंकल्यावर गावातील लोक आणि सूरजचे मित्र ‘गुलीगत पॅटर्न’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. व्हिडीओत जमलेली गर्दी पाहायला मिळतेय आणि गुलालाची उधळण करून सगळे नाचत आहेत.

हेही वाचा – लहानपणी आई-वडिलांचं निधन, सख्ख्या ५ बहिणी अन्…;Bigg Boss विजेत्या सूरज चव्हाणचा संघर्षमय प्रवास, जाणून घ्या…

पाहा सूरजच्या गावातील व्हिडीओ

सूरज चव्हाणच्या गावातील सेलिब्रेशनचा व्हिडीओ (सौजन्य – इन्स्टाग्राम)

सूरज चव्हाण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करून बिग बॉस मराठीपर्यंत पोहोचला. मोढवे गावात जन्मलेला सूरज इन्स्टाग्राम रील्समुळे लोकप्रिय झाला. सूरजला अनेकांनी दिसण्यावरून ट्रोल केलं, बोलण्यावरून ट्रोल केलं, पण तो त्या रील्स बनवतच राहिला आणि त्यातूनच त्याला लोकप्रियता मिळाली. पुढे त्याच्यासाठी बिग बॉस मराठीचे दरवाजे उघडले.

हेही वाचा – सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi 5 जिंकल्यावर प्रवीण तरडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या सूरजचे आई-वडील तो लहान असतानाच वारले. पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ सूरजला त्याची आत्या आणि बहिणींना मोठं केलं. कॅन्सरमुळे वडील गेले आणि त्याचा धक्का बसल्याने आई वेडी झाली, काही काळाने तीही गेली, असं सूरजने सांगितलं होतं.

हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा उपविजेता ठरलेल्या अभिजीत सावंतची पहिली पोस्ट; म्हणाला, “मला जे वाटतंय ते…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूरज चव्हाणने बिग बॉसमधील सर्व स्पर्धकांना मागे टाकत ही ट्रॉफी जिंकली. लिहिता-वाचताही येत नसलेल्या सूरजने आपल्या साधेपणाने लोकांची मनं जिंकली. लोकांनी त्याच्या साधेपणामुळे त्याला भरभरून मतं दिली आणि तो या शोचा विजेता ठरला.