Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता बीबी करन्सी मिळवण्यासाठी नवीन टास्क सुरू होणार आहे. संपूर्ण गार्डन परिसरात ‘बिग बॉस’च्या टीमकडून ‘पाताळ लोक’ ही थीम तयार करण्यात आली आहे. यासाठी घरात दोन टीम्स बनवण्यात आल्या आहेत. एका ग्रुपमध्ये अभिजीत-निक्की, वैभव-धनंजय आणि पॅडी-घन:श्याम आहेत. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये अभिजीत-आर्या, वर्षा-अंकिता आणि सूरज-जान्हवी यांचा समावेश आहे.

सध्या संपूर्ण घर निक्की-अभिजीतच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळत आहे. अरबाज आणि निक्कीमध्ये टोकाचे वाद होऊन ग्रुप ‘ए’मध्ये मोठी फूट पडली आहे. अरबाज नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात रडून – हात जोडून, मला टोमणे मारू नकोस अशी विनंती निक्कीला करत होता. अरबाजला खचलेलं पाहून जान्हवी, वैभव, आर्या, वर्षा सगळेच निक्कीशी भांडू लागले. या सगळ्यात जोड्यांचा टास्क असल्याने अभिजीत तिच्याबरोबर होता.

हेही वाचा : Bigg Boss Marathi…अन् सगळ्यांशी भांडणारी निक्की ढसाढसा रडली! अरबाजबद्दल म्हणाली, “मी या मुलासाठी…”

निक्कीला सगळेच वैतागले

अभिजीत आणि निक्की आता स्वत:चा एक वेगळा गेम खेळणार अशी शक्यता वाटत असतानाच आता पाताळ लोक टास्कमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे. हा ट्विस्ट म्हणजे आता अभिजीत सुद्धा निक्कीच्या वागणुकीला कंटाळून तिच्या विरोधात जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला धनंजय तिला सांगतो, “आपल्याला या करन्सीवर पोटाला खायला अन्न मिळणार आहे” पण, निक्की कोणाचं ऐकून घ्यायला तयार नसते. अभिजीत यानंतर “याच्यापुढे मला पार्टनर बनायचं नाहीये” असं निक्कीसमोर स्पष्ट करतो.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : दोन दिवसांत अभिजीत सावंत बदलला…; मित्रमंडळींचा मोठा आरोप! निक्कीशी मैत्री पडली भारी, नेमकं काय घडलं?

अभिजीतने पहिल्यांदाच निक्कीविरोधात घेतलेली ही भूमिका पाहून घरातले सगळे सदस्य त्याला सॅल्यूट ठोकतात. सूरज, आर्या, अरबाज, जान्हवी अभिजीतसमोर हात जोडून सॅल्यूट ठोकत असल्याचं पाहायला मिळत आहे.

bigg boss marathi
Bigg Boss Marathi च्या घरात नवीन टास्क ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

हेही वाचा : Bigg Boss Marathi “हा शो निक्की-अरबाजच्या लव्हस्टोरीचा नाही…”, पुष्कर जोग संतापला; पोस्ट शेअर करत थेट ‘बिग बॉस’ला केली विनंती

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाताळ लोक या टास्कमध्ये ( Bigg Boss Marathi ) दोन्ही ग्रुपच्या सदस्यांना जास्तीत जास्त सोन्याची नाणी जमा करायची आहेत. आता यामध्ये कोणती टीम बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.