Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच ‘पाताळ लोक’ टास्क पार पडला. यासाठी घरात दोन गट बनवण्यात आले होते. यापैकी ‘ए’ टीममध्ये निक्की-अभिजीत, घन:श्याम – पॅडी, वैभव-डीपी हे सदस्य होते. तर, जान्हवी-सूरज, अरबाज-आर्या, अंकिता-वर्षा या जोड्या ‘बी’ टीममध्ये होत्या. ‘पाताळ लोक’ टास्कमध्ये एकूण तीन फेऱ्या पार पडल्या. या दरम्यान घरात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…

‘पाताळ लोक’ टास्कमध्ये पहिल्या फेरीत वैभव-डीपी विरुद्ध अरबाज-आर्या अशा जोड्या होत्या. या फेरीत धनंजयने पाताळ लोकातून सर्वाधिक सोन्याची नाणी जमा करून आणली होती. परंतु, पहिल्या फेरीत कार्याच्या संचालक निक्की व जान्हवीमध्ये वाद झाल्याने दोन्ही गटांना शून्य गुण मिळाले.

यानंतर दुसऱ्या फेरीत अभिजीत आणि जान्हवी पाताळ लोकात नाणी शोधायला गेले. यात अभिजीतच्या पायाला दुखापत झाल्याने जान्हवीने एकहाती बाजी मारली. परंतु, खरा ड्रामा तिसऱ्या फेरीत झाला.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : बाईईई…! निक्की तांबोळीची भलतीच क्रेझ; चक्क पुणेकरांनी लगावले ठुमके; दहीहंडीचा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

‘बिग बॉस’ने तिसऱ्या फेरीत आर्या व पंढरीनाथ यांना पाताळलोकात पाठवलं. या टास्कमध्ये आर्या-वर्षा आणि पंढरीनाथ-घन:श्याम या जोड्यांमध्ये चांगलीच झटापट झाली. सुरुवातीला घन:श्याम पॅडीच्या हातातून सोन्याची नाणी हातात घेताना पाताळ लोकात पडला तेव्हा अरबाजने त्याला बाहेर काढलं आणि याचवेळी अंकिताने त्याची नाणी चोरल्याचा दावा घन:श्यामने केला. अंकिताने नाणी चोरल्याचा आरोप करत घन:श्यामने वर्षा यांच्या हातातला बॉक्स फोडला ( सोन्याची नाणी ठेवण्याकरता दिलेला डबा ) आणि समोरच्या टीमची नाणी गोळा केली. यावेळी अनेकांनी ही चिटींग आहे असा आरोप घन:श्यामवर केला.

अंकिता – घन:श्याममध्ये झटापट

सगळी नाणी गोळा करून घन:श्याम नाणी वाचवण्यासाठी दूर पळून जातो आणि याचवेळी अंकिता त्याच्या मागे जाते. दोघांमध्ये या फेरीत मोठी झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. घन:श्याम एवढ्यावर शांत न बसता पुन्हा पाताळ लोकाच्या गुहेकडे वर्षा उसगांवकरांकडून नाणी चोरण्यासाठी जातो. यावेळी मात्र अंकिताला राग अनावर होतो. ती घन:श्यामच्या पायाला धरून त्याला फरफटत खेचते, घन:श्यामला बांधलेली दोरी खेचून अंकिताने या टास्कमध्ये त्याला संपूर्ण लोळावल्याचं पाहायला मिळालं. सगळेच आक्रमक झाल्याचं पाहून ‘बिग बॉस’कडून कार्य स्थगित करण्याची घोषणा केली जाते. याशिवाय निक्कीदेखील असा पाय खेचणं योग्य नसल्याचं सर्वांना सांगते.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

हेही वाचा : Bigg Boss Marathi : निक्कीबद्दल अभिजीतने घेतला मोठा निर्णय! सूरज-अरबाजसह सर्वांनी ठोकला सॅल्यूट; ‘पाताळ लोक’ टास्कमध्ये काय घडणार?

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्य मध्येच स्थगित झाल्याने सरतेशेवटी अंकिता या फेरीत बाजी मारते आणि हा टास्क ‘बी’ गट जिंकतो. मात्र, बीबी करन्सीचा विचार न करता सगळेजण स्वार्थीपणे खेळल्याने अभिजीत व पॅडी प्रचंड नाराज झाल्याचं या टास्कमध्ये पाहायला मिळालं. याशिवाय ‘बी’ टीम विजयी झाल्याने त्यांनी मिळालेल्या विशेष अधिकाराचा वापर करत निक्की-अभिजीत व पॅडी-घन:श्याम यांच्याकडून कॅप्टन्सीची उमेदवारी काढून घेतली आहे.