Bigg Boss Marathi Dhananjay Powar : बिग बॉसच्या घरातील ७० दिवसांचा प्रवास पूर्ण करून प्रेक्षकांचा लाडका ‘डीपी दादा’ आता कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. जवळपास अडीच महिन्यांनी तो घरी परतणार आहे. २८ जुलैला ‘बिग बॉस’चा भव्य ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला होता. यावेळी घरात १५ वा सदस्य म्हणून डीपीने एन्ट्री घेतली होती. घरात सहभागी झालेला हा रांगडा गडी शेवटी टॉप-४ पर्यंत मजल मारेल अशी अपेक्षा कोणीच केली नव्हतं. मात्र, दिवसेंदिवस धनंजयला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम वाढू लागलं अन् तो घराघरांत ‘डीपी दादा’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

धनंजय आणि त्याच्या वडिलांमध्ये गेली अनेक वर्षे अबोला होता. आपल्या वडिलांच्या तोंडून अभिमानाचे शब्द ऐकावे, ‘धनंजयचे वडील’ असं माझ्या वडिलांना ओळखलं जावं अशी डीपीची खूप आधीपासूनची इच्छा होती. अखेर मुलाने मिळवलेलं हे यश पाहण्यासाठी धनंजयचे वडील स्वत: ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात आले होते. हे बापलेक ‘फॅमिली टास्क’ दरम्यान प्रचंड भावुक झाले होते. यानंतर ग्रँड फिनालेला सुद्धा संपूर्ण पोवार कुटुंब उपस्थित होतं. महाअंतिम सोहळा पार पडल्यावर त्याचे कुटुंबीय पुन्हा कोल्हापूरला गेले मात्र, मुलाखती व अन्य कामासाठी धनंजयला मुंबईत थांबावं लागलं.

हेही वाचा : Bigg Boss 18 : मराठमोळी शिल्पा शिरोडकर आहे ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारची मेहुणी; स्वत: खुलासा करत म्हणाली…

कोल्हापुरात परतणार धनंजय पोवार

धनंजय आज ( ९ ऑक्टोबर ) जवळपास अडीच महिन्यांनी आपल्या स्वगृही पतरणार आहे. यासाठी कोल्हापूरकरांनी जय्यत तयारी केली आहे. ‘सोसायटी फर्निचर’ या त्याच्या दुकानाबाहेर खास ‘कोल्हापुरी हलगी’ आणि ‘संभळ’ वाजवून डीपीचं स्वागत करण्यात येणार आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. मात्र, या सगळ्या तयारीची देखरेख एक खास व्यक्ती करत आहे. ते आहेत धनंजय पोवारचे बाबा!

धनंजयचे ( Bigg Boss Marathi ) वडील अजित आज अडीच महिन्यांनी घरी परतणाऱ्या लेकाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. मुलाच्या स्वागताची सगळी तयारी कशी काय सुरू आहे हे पाहण्यासाठी धनंजयचे वडील स्वत: इचलकरंजीत उपस्थित राहिल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. फोनवर संवाद साधून, सगळी व्यवस्था बरोबर आहे की नाही? या सगळ्या गोष्टींकडे डीपीच्या बाबांनी आवर्जुन लक्ष दिल्याचं या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : Video : सूरज ‘बिग बॉस’ची ट्रॉफी घेऊन गावी पोहोचला, चाहत्यांची गर्दी अन् झालं असं काही…; नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनंजयचा वडिलांचा हा व्हिडीओ bolka.popat या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आता डीपीचं ( Bigg Boss Marathi ) कोल्हापुरात कोणत्या जल्लोषात स्वागत केलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.