‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेले अनेक कलाकार कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सुरेखा कुडची. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा म्हणून त्यांना ओळखले जाते. सध्या त्या त्यांच्या एका पोस्टमुळे चर्चेत आल्या आहेत.

सुरेखा कुडची या इन्स्टाग्रामवर सतत सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्या कोल्हापुरच्या ज्योतिबाचं दर्शन घेताना दिसत आहेत. या व्हिडीओला त्यांनी हटके कॅप्शन दिलं आहे.
आणखी वाचा : निर्मिती सावंतची धमाल, रिंकू राजगुरुचा नवा अंदाज अन्…; ‘झिम्मा २’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

“गेले काही दिवस कोकणात म्हणजे कुडाळला शूट ला गेले होते. तिथून पुण्याला येताना कोल्हापूरला जायचा योग आला .. आणि मग काय … म्हटलं चला ज्योतिबाच दर्शन घतल्याशिवाय पुणे गाठायच नाही … खूप छान दर्शन झालं … ज्योतिबाच्या नावानं चांगभलं भल ….”, असे सुरेखा कुडची यांनी म्हटलं आहे.

ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर सुरेखा कुडची यांनी मिसळवर ताव मारला. त्यांनी कोल्हापूरच्या फडतरे मिसळ सेंटरला भेट देऊन त्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. “कुडाळला शूटिंग संपवून कोल्हापूरला आले ते थेट फडतरे मिसळ खायला… कोल्हापूरची ही मिसळ म्हणजे नाद करायचा नाय… 20 min वेटींगला थांबले पण शेवटी मिसळ खाऊनच बाहेर पडले…”, असे कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिले आहे.

आणखी वाचा : अक्षय केळकरने सोडलं कळव्याचं घर, व्हिडीओ शेअर करत म्हणाला “आम्हाला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरेखा कुडची यांचे हे दोन्हीही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. दरम्यान सध्या त्या ‘तुझ्या रूपाचं चांदणं’ आणि ‘आशिर्वाद तुझा एकवीरा आई या दोन मालिकेत झळकत आहेत. त्याबरोबरच लवकरच त्या एका चित्रपटातही झळकणार असल्याचे बोललं जात आहे.