सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजेरकरने हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली आहे. सत्या मांजरेकरच्या या हॉटेलचे अनेकजण कौतुक करताना दिसत आहे. बिग बॉस फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि मेघा धाडे यांनी नुकतंच सत्य मांजरेकरच्या हॉटेलमधील जेवणाची चव चाखली. त्याचा एक व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.

महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकरने काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगरातील गोरेगाव परिसरात स्वत:चे हॉटेल सुरु केले आहे. ‘सुका सुखी’ (Suka Sukhi) असं सत्याच्या हॉटेलचं नाव आहे. या हॉटेलला नुकतंच तेजस्विनी लोणारी आणि मेघा धाडे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी या हॉटेलमध्ये चमचमीत पदार्थांची चव घेतली.
आणखी वाचा : Video : करंदी, काळं चिकन अन् सोलकढी; सत्या मांजरेकरच्या हॉटेलमधून नीना कुळकर्णींनी ऑर्डर केलं जेवण, म्हणाल्या “पदार्थांची चव…”

नुकतंच तेजस्विनीने याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तेजस्विनी आणि मेघा धाडे या सत्या मांजरेकरच्या रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसत आहेत. यावेळी ते काही ग्राहकांशी संवाद साधतानाही दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने हॉटेलमधील पदार्थांच्या चवीबद्दल सांगितले आहे.

आणखी वाचा : Video : चांदीच्या ताटातील पक्वान्न, सुंदर उखाणा अन्… प्रथमेश लघाटेच्या पहिल्या केळवणाचा थाट पाहिलात का?

“आम्ही महेश मांजरेकरांच्या स्वादिष्ट ‘सुका सुखी’ हॉटेलच्या पदार्थांची चव चाखली. त्यांचं काळं चिकन, बोंबील फ्रय, करंदी, सुकट आणि खिमा पाव हे सर्व पदार्थ खरोखरच फारच उत्तम होते. केवळ मासांहारी जेवणचं नव्हे तर शाकाहारी जेवणाचे पदार्थही चविष्ट होते. गवार, वालाची भाजी आणि इतर अनेक पदार्थ हे चांगले आहेत”, असे तेजस्विनी सांगितले.

“या हॉटेलची एक खास गोष्ट म्हणजे याचे मसाले आणि वाटण. या दोन्हीही गोष्टी थेट महेश मांजरेकरांच्या घरात बनवल्या जातात आणि त्या इथे आणल्या जातात. यावेळी सत्या मांजरेकरने आमचे उत्तम आदरातिथ्य केले. तो खरंच यासाठी खूप मेहनत करत आहे. सत्या मांजरेकरला यासाठी खूप खूप शुभेच्छा”, असेही तेजस्विनी लोणारीने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.