Bigg Boss Marathi Pandharinath Kamble First Post : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतीच नवव्या आठवड्याची एलिमिनेशन प्रक्रिया पार पडली. यावेळी अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार आणि पॅडी कांबळे असे चार सदस्य डेंजर झोनमध्ये होते. यापैकी सर्वात आधी धनंजय सेफ झाला. त्यानंतर जान्हवीला सुरक्षित करण्यात आलं. शेवटी बॉटम २ मध्ये अंकिता आणि पॅडी कांबळे हे दोन सदस्य होते. यांच्यापैकी पंढरीनाथ कांबळेचा प्रवास ‘बिग बॉस’च्या घरातून आता संपला आहे.

पॅडीने तब्बल ६२ दिवसांनंतर ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घेतला आहे. ऐन शेवटच्या क्षणी एलिमिनेट झाल्याने पॅडीच्या मनाला ही गोष्ट प्रचंड लागली. मात्र, घराबाहेर जाताना अभिनेत्याने त्याचा पूर्ण पाठिंबा सूरजला दिला. स्वत:च्या म्युच्युअल फंड्समधील ५० कॉइन्सचा वारसदार देखील पॅडीने सूरजला केलं आहे. पंढरीनाथच्या एलिमिनेशनवर मराठी कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता घराबाहेर आल्यावर पॅडी कांबळेने त्याची पहिली पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “मी सूरजचं पालकत्व…”, घराबाहेर जाताना पंढरीनाथ कांबळेने सांगितला मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक

घराबाहेर आल्यावर पंढरीनाथची पहिली पोस्ट

“आपण रसिक मायबाप प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रेमासाठी आपले मनापासून आभार!” अशा मोजक्या शब्दांत भावना व्यक्त करत अभिनेत्याने घराबाहेर ( Bigg Boss Marathi ) आल्यावर ही आपली पहिली पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एक व्हिडीओ देखील दिसत आहे. पॅडीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या ग्राफिक्समध्ये पंढरीनाथ एखाद्या वॉरियरप्रमाणे लढा देत असल्याचं पाहायला मिळत आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.

हेही वाचा : Bigg Boss मध्ये गैरहजर राहणाऱ्या रितेश देशमुखचा परदेशातील व्हिडीओ आला समोर! जिनिलीया म्हणते, “बाबाला २० दिवसांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Bigg Boss Marathi Pandharinath Kamble First Post
Bigg Boss Marathi Pandharinath Kamble : पॅडीच्या एलिमिनेशनवर नेटकरी नाराज

पॅडीची लेक ग्रीष्माने या पोस्टवर भावुक करणारा आणि हॉर्ट इमोजी कमेंट केला आहे. याशिवाय अन्य चाहत्यांनी, “दादा तुमच्याबरोबर चुकीचं झालंय”, “तूच विजेता आहेस रे आमच्यासाठी पॅडी दादा”, “Unfair eviction झालं दादा”, “Unfair झालं…Paddy तुझी इच्छा सूरज चव्हाण नक्की पूर्ण करेल आणि ट्रॉफी तुझाच सूरज जिंकेल… खूप खरा माणूस आहे”, “तुम्ही नट म्हणून तर महान आहातच पण, माणूस म्हणून देव आहात” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी पॅडीच्या घराबाहेर आल्यावरच्या पहिल्या पोस्टवर केल्या आहेत.