अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. सध्या ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व रंजक होत आहे. शेवटचे काहीच आठवडे शिल्लक असताना स्पर्धकांची खेळात टिकून राहण्यासाठी चढाओढ सुरू आहे. या आठवड्याच फॅमिली स्पेशल वीक सेलिब्रेट करण्यात येत आहे.

घरातील सदस्यांच्या कुटुंबियांनी फॅमिली स्पेशल वीकमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात हजेरी लावली. कुटुंबियांना पाहून स्पर्धक भावूक झालेले पाहायला मिळाले. इतर स्पर्धकांच्या कुटुंबियांना पाहून राखीलाही तिच्या आईची फार आठवण येत होती. तिची आई आजारी असल्यामुळे येऊ शकत नाही, असं ती वारंवार इतर सदस्यांना म्हणत होती. याआधीही ‘बिग बॉस’मध्ये मी सहभागी झाले होते. परंतु, तेव्हाही माझ्या घरातून कोणीच आलं नाही, असं ती म्हणत होती.

हेही वाचा>>“छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना रायगडावरुन ऑर्डर…”, शरद पोंक्षेंनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

आताही माझ्या घरातून कोणी येणार नाही, असं राखी सदस्यांशी म्हणत असतानाच ‘बिग बॉस’ने तिला आश्चर्याचा धक्का दिला. राखीचा बॉयफ्रेंड आदिल खानने घरात एन्ट्री घेताच तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. आदिलने घरात येताच राखीची शाळा घेतली. घरातील सदस्यांशी गप्पा मारल्यानंतर आदिलने ‘बिग बॉस’च्या घरातच सगळ्यांसमोर राखीला प्रपोज केलं.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातला मिळाला नवीन मराठी चित्रपट; पोस्टर शेअर करत म्हणते…

हेही वाचा>> “…म्हणून मी त्यांना चित्रपटात घेतो”, रोहित शेट्टीचं मराठी कलाकारांबाबत मोठं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केल्यापासूनच राखीने सदस्यांसह प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील राखी एंटरटेनमेंटचं फूल पॅकेज आहे.