Bigg Boss Marathi Sangram Chougule Eliminate : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात यंदा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरात प्रसिद्ध बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने एन्ट्री घेतली होती. ८ सप्टेंबरला भाऊच्या धक्क्यावर पहिला परफॉर्मन्स सादर करून ९ सप्टेंबरला त्याची प्रत्यक्ष घरात एन्ट्री झाली होती. संग्राम घरात आल्यावर नेमकं काय पाहायला मिळणार? तो कोणाला साथ देणार… कसा गेम खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, अवघ्या दोन आठवड्यांमध्येच त्याला घराचा निरोप घ्यावा लागला आहे.

‘बिग बॉस’ने संग्रामला कन्फेशन रुममध्ये बोलावून याबद्दल माहिती दिली. हाताची दुखापत मोठ्या प्रमाणात असल्याने तुम्हाला हे घर सोडावं लागणार आहे. डॉक्टरांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात आल्याचं ‘बिग बॉस’ने यावेळी त्याला सांगितलं. वैद्यकीय कारणांमुळे संग्रामला ताबडतोब घराचा निरोप घेण्यास सांगण्यात आलं. दारावर लावलेली नावाची पाटी काढून त्याने यंदाच्या सीझनमधून एक्झिट घेतली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – भाऊचा धक्का नव्हे तर…; या आठवड्यात रितेश देशमुख घेणार नाही सदस्यांची शाळा, काय आहे कारण?

संग्रामचा प्रवास अगदीच थोड्या कालावधीचा म्हणजेच एकूण १४ दिवसांचा होता. त्यामुळे त्याला योग्यप्रकारे स्वत:चा खेळ दाखवता आलेला नाही. मात्र, संग्रामने घराचा निरोप घेतल्यावर नेटकऱ्यांनी ‘बिग बॉस’च्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संग्राम एलिमिनेट झाल्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“अरबाज वाचला…व्हा रे बिग बॉस तुमची शाळा”, “‘बिग बॉस’ तुम्ही फेअर खेळा एलिमिनेशन झालं पाहिजे”, “या आठवड्याचं एलिमिनेशन झालं त्यामुळे निक्की-अरबाज सेफ असणार”, “हे माहितीच होतं अरबाजला वाचवायला याला बाहेर काढलं” अशा कमेंट्स करत संग्रामच्या एलिमिनेशनवर नेटकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : Video: महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट, रांगडी प्रेमकथा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस, ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेची घोषणा

Bigg Boss Marathi Sangram Chougule Eliminate
Bigg Boss Marathi Sangram Chougule Eliminate : नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त केली नाराजी

हेही वाचा : Bigg Boss Marathi – घराबाहेर झालेली आर्या थेट पोहोचली योगिता चव्हाणच्या घरी; दरवाजात लाडक्या मैत्रिणीला पाहताच…, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Bigg Boss Marathi : कोण आहे संग्राम चौगुले

संग्राम चौगुले हा कोल्हापूरचा आहे. लोकप्रिय बॉडीबिल्डर म्हणून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. संग्राम अतिशय फिटनेस फ्रिक आहे. २०१२ मध्ये त्याने ८५ किलो वजनी गटात मिस्टर युनिव्हर्सचं विजेतेपद पटकावलं होतं. तर, २०१४ मध्ये संग्रामने मिस्टर वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती.