‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सहभागी झाली. शोच्या पहिल्या आठवड्यापासूनच तिने घरात राडा करण्यास सुरुवात केली. विकास सावंत, किरण माने, अमृता धोंगडे सारख्या सदस्यांशीही तिचं भांडण झालं. सध्या ती या शोमुळे चर्चेत आहे. पण त्याचबरोबरीने अपूर्वा तिच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिली आहे. अपूर्वा सध्या सिंगल असली तरी तिचं याआधी लग्न झालं होतं. आता पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यास ती तयार झाली आहे असं दिसत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’चा मोठा निर्णय, एकाचवेळी दोन सदस्य घराबाहेर जाणार, कोण आहेत ते स्पर्धक? व्हिडीओ समोर

अपूर्वाचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या काही महिन्यांमध्येच तिचा घटस्फोट झाला. रोहन देशपांडे असं तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं नाव होतं. २०१४ मध्ये अपूर्वा-रोहनने लग्न केलं. जवळपास आठ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.

आता अपूर्वा दुसऱ्या लग्नाचा विचार करत आहे. ‘बिग बॉस’ मराठीमध्येच तिने याबाबत भाष्य केलं आहे. अक्षय, अमृता देशमुख यांच्याशी गप्पा मारताना तिने याबाबत खुलासा केला. “माझ्या इतकी शांत मुलगी या घरात कोणीच नाही. तरीही मलाच सगळे बोलतात.” असं अपूर्वा बोलते. लग्नाचं वय झालं तुझं आणि तू मला बोलते असं गंमतीने अक्षय अपूर्वाला म्हणतो.

आणखी वाचा – बॉयफ्रेंडशीच केलं लग्न, पण त्याआधीच दुसऱ्या व्यक्तीशी…; लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर शिल्पा तुळसकरचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर अपूर्वा म्हणते, “अजून हवा तसा खजिना मला मिळाला नाही.” लग्न करण्यासाठी मुलाला कोणत्याच अटी घालणार नसल्याचं अमृता यावेळी म्हणते. आता खरंच अपूर्वा दुसरं लग्न करणार का? हे काही काळानंतर समोर येईलच.